सागरवरील गुन्हा रद्दबातलचा निर्णय आठ महिन्यावर
By admin | Published: November 19, 2015 09:58 PM2015-11-19T21:58:03+5:302015-11-19T21:58:03+5:30
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी वाळुमाफिया सागर चौधरी याच्याविरुध्द नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रद्दचा निर्णय आता आठ महिन्यावर पुढे ढकलण्यात आला आहे. सादरेंना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते व वाळूमाफिया सागर चौधरीविरुध्द पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ात अटक होऊ नये यासाठी सागरने अटकपूर्वसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, मात्र त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे हा गुन्हाच रद्दबातल करावा यासाठी सागरने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर कामकाज होऊन याबाबतच्या निर्णयासाठी २६ जुलै २०१६ रोजीची तारीख न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सागरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Next
ज गाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी वाळुमाफिया सागर चौधरी याच्याविरुध्द नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रद्दचा निर्णय आता आठ महिन्यावर पुढे ढकलण्यात आला आहे. सादरेंना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते व वाळूमाफिया सागर चौधरीविरुध्द पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ात अटक होऊ नये यासाठी सागरने अटकपूर्वसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, मात्र त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे हा गुन्हाच रद्दबातल करावा यासाठी सागरने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर कामकाज होऊन याबाबतच्या निर्णयासाठी २६ जुलै २०१६ रोजीची तारीख न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सागरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.