नोटा रद्द करण्याचा निर्णय जनतेच्या हिताचाच : मोदी

By admin | Published: November 15, 2016 02:16 AM2016-11-15T02:16:40+5:302016-11-15T02:16:40+5:30

पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कुठल्या कायद्याच्या आधारे हा निर्णय घेतला, असा प्रश्न मला काँग्रेसचे नेते विचारत आहेत

The decision to cancel the notes is only for the welfare of the people: Modi | नोटा रद्द करण्याचा निर्णय जनतेच्या हिताचाच : मोदी

नोटा रद्द करण्याचा निर्णय जनतेच्या हिताचाच : मोदी

Next

गाझीपूर : पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कुठल्या कायद्याच्या आधारे हा निर्णय घेतला, असा प्रश्न मला काँग्रेसचे नेते विचारत आहेत, पण काँग्रेसने ते सत्तेवर असताना चार आणे बंद केले होते. त्या वेळी कोणता कायदा लावला होता, असा माझा त्यांना सवाल आहे. तुम्ही २५ पैशांच्या पुढे गेला नाहीत. तुम्ही तुम्हाला साजेल असेच काम केले. आम्ही मात्र, आमच्या बरोबरीचे काम केले आणि त्यामुळे काळ्या पैशाला पायबंद बसणार आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोमवारी झालेल्या सभेत काढले.
या सभेत मोदी यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, ‘काँग्रेसने या देशात १९ महिने आणीबाणी लावली होती. त्या काळात तुमचे नेते व कार्यकर्ते यांनी जनतेचा पैसा हडप केला. संपूर्ण देशाला तुरुंग बनवून टाकला होता. काँगेसला सरकारच्या हेतूवर शंका घेण्याचा कोणताही अधिकार नाही.’ पाकस्तानचे नाव न घेता, पंतप्रधान म्हणाले की, ‘सीमेपलीकडे बनावट नोटा छापल्या जात होत्या. हा पैसा दहशतवाद, नक्षलवाद पसरवण्यास वापरला जात होता. देशाविरोधात सुरू असलेला पैशाचा हा वापर थांबवणे आवश्यक होते. त्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला.’ (वृत्तसंस्था)
मोदी म्हणाले की...
च्५00 आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, त्या बदलून घेण्यासाठी सध्या गरीब जनतेला, सर्वसामान्यांना जो त्रास होत आहे, त्याची मला पुरेपूर कल्पना आहे.
च्मला त्याच्या भरपूर वेदना होत आहेत. गरीब व सर्वसामान्यांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी मी आणि माझे सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहोत.
च्पण आमची मोहीम या देशातून काळ्या पैशांचे उच्चाटन करणे ही आहे. त्यासाठी मला फक्त ५० दिवस हवे आहेत.
च्जनतेला त्रास होत असला, तरी तेवढा वेळ देण्यास जनतेची तयारी आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत.

Web Title: The decision to cancel the notes is only for the welfare of the people: Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.