शशिकला आणि दिनाकरनला हटवण्याचा निर्णय हा पहिला विजय - पनीरसेल्वम

By admin | Published: April 19, 2017 02:24 PM2017-04-19T14:24:25+5:302017-04-19T14:24:25+5:30

शशिकला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना पक्षाबाहेर काढण्याचा निर्णय म्हणजे आमच्या गटाचा पहिला विजय आहे.

The decision to delete Shashikala and Dinakaran was the first win - Paneerselvam | शशिकला आणि दिनाकरनला हटवण्याचा निर्णय हा पहिला विजय - पनीरसेल्वम

शशिकला आणि दिनाकरनला हटवण्याचा निर्णय हा पहिला विजय - पनीरसेल्वम

Next

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई दि. 19 - शशिकला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना पक्षाबाहेर काढण्याचा निर्णय म्हणजे आमच्या गटाचा पहिला विजय आहे असे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे नेते ओ पनीरसेल्वम यांनी बुधवारी सांगितले. मंगळवारी रात्री चेन्नईत झालेल्या अण्णाद्रमुकच्या बैठकीत शशिकला आणि दिनाकरला पदावरुन हटवण्याचा निर्णय झाला. 
 
सध्या अण्णाद्रमुकमध्ये दोन गट पडले असून, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम या गटांचे नेतृत्व करत आहेत. शशिकला आणि तिचा भाचा दिनाकरनला पक्षाबाहेर काढण्याच्या अटीवर पनीरसेल्वम यांनी तडजोडीची तयारी दाखवली होती. आता लवकरच आम्ही बैठक करुन आमच्यातील मतभेद मिटवू असे पनीरसेल्वम यांनी सांगितले. 
 
पक्ष एकसंध ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता असे अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी सांगितले. शशिकलाचा भाचा दिनाकरन सध्या अडचणीत सापडला आहे. पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी दिनाकरन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  
 

Web Title: The decision to delete Shashikala and Dinakaran was the first win - Paneerselvam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.