ईडीच्या अर्जावरील निर्णय १८ एप्रिलला

By admin | Published: April 17, 2016 01:36 AM2016-04-17T01:36:53+5:302016-04-17T01:36:53+5:30

किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, या सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील निर्णय विशेष न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला.

Decision on ED application on April 18 | ईडीच्या अर्जावरील निर्णय १८ एप्रिलला

ईडीच्या अर्जावरील निर्णय १८ एप्रिलला

Next

मुंबई : किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, या सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील निर्णय विशेष न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला.
विजय मल्ल्या यांच्यावर कट रचल्याचा व अन्य गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच आयडीबीआय बँकेने किंगफिशर एअरलाईन्स लि. ला दिलेल्या ९०० कोटी रुपयांच्या कर्जाबाबतही केस नोंदवण्यात आल्याचे ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी विशेष प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाला सांगितले.
या प्रकरणी मल्ल्या यांच्यावर सीबीआयनेही केस नोंदवली आहे. मल्ल्या यांनी बँकेने दिलेल्या ९०० कोटी रुपयांपैकी ४३० कोटी रुपये युरोपमध्ये मालमत्ता खरेदी करण्यात खर्च केले, अशीही माहिती अ‍ॅड. वेणेगावकर यांनी न्या. पी. व्ही. भावके यांना दिली. ‘मल्ल्या यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याकरिता तीन समन्स बजावले. मात्र त्यांनी त्यांच्या सोयीनुसार चौकशीकरिता उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपीला स्वत:च्या सोयीनुसार चौकशीसाठी हजर राहण्याचा अधिकार नाही. हे तपासअधिकाऱ्यावर अवलंबून आहे,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. वेणेगावकर यांनी केला. मल्ल्या त्यांची परदेशातील मालमत्ता विकण्याची व पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास तपास यंत्रणेच्या व बँकेच्या हाती काहीही लागणार नाही, असेही अ‍ॅड. वेणेगावकर यांनी विशेष न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Decision on ED application on April 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.