हलबा समाजाच्या प्रश्नावर लवकरच निर्णय
By admin | Published: August 11, 2015 11:16 PM2015-08-11T23:16:02+5:302015-08-11T23:16:02+5:30
नवी दिल्लीत बैठक : केंद्रीय आदिवासी मंत्र्यांचे आश्वासन
Next
न ी दिल्लीत बैठक : केंद्रीय आदिवासी मंत्र्यांचे आश्वासननागपूर : हलबा समजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासंदर्भात लवकच सचिवस्तरावरील बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय आदिवासी मंत्री जुएल ओराम मंगळवारी दिले.हलबा समाच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयात विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हलबा जमातीच्या कोर कमिटीच्या शिष्टमंडळाने ओराम यांच्याची चर्चा केली. कमिटीचे अध्यक्ष नांदकर, आमदार विकास कुंभारे ,सुधाकर कोहळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. हलबा जमातीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच सचिव पातळीवरील बैठक आयोजित करण्याचे आश्वासन ओराम यांनी कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. शासकीय नोकरीत हलबा समाजाला अनुसूचित जमतीप्रमाणे सोयी, सवलतीचा लाभ मिळावा. अशी मागणी कुंभारे यांनी केली. हलबा समाज विणकराचे काम करतो. यावरून महाराष्ट्रात त्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत नसल्याचे कुंभारे यांनी निदर्शनास आणले. मागील काही वर्षापासून समाजाची आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. बैठकीमुळे ही मागणी लवकरच मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी) .........फोटो ओळी ....केंद्रीय आदिवासी मंत्री जुएल ओराम व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना हलबा समाजाच्या मागण्याचे निवेदन सादर करताना आमदार विकास कुंभारे व कोर कमिटीचे पदाधिकारी.