शिवसेनेच्या बैठकीचं निर्णयपत्र मराठीत, कोर्टासमोर पेच; मराठी सरन्यायाधीश आले धावून अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:02 PM2023-02-22T12:02:27+5:302023-02-22T12:04:36+5:30

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून आज सलग दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत.

Decision letter of Shiv Sena meeting in Marathi Chief Justice dy chandrachud read it for court | शिवसेनेच्या बैठकीचं निर्णयपत्र मराठीत, कोर्टासमोर पेच; मराठी सरन्यायाधीश आले धावून अन्...

शिवसेनेच्या बैठकीचं निर्णयपत्र मराठीत, कोर्टासमोर पेच; मराठी सरन्यायाधीश आले धावून अन्...

googlenewsNext

नवी दिल्ली-

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून आज सलग दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाविरोधात खरंतर आज दुपारी साडेतीन वाजता सुनावणी सुरू होणार आहे. पण सध्या सुरू असलेल्या सुनावणीतही कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा मुद्दा उपस्थित करत पक्षात लोकशाही असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. सिब्बल यांनी यासाठी २०१८ साली झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची माहिती दिली आहे. 

कबिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीच्या सुरुवातीलाच २७ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीकडे खंडपीठाचं लक्ष वेधलं. या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून सर्वांनी अनुमोदन दिलं होतं. त्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा देखील पाठिंबा होता असं सिब्बल यांनी सांगितलं. 

मराठीतील पत्रानं निर्माण झालेला पेच असा सुटला
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचं पत्र मराठी भाषेत होतं. हे पत्र जेव्हा आज कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर सादर केलं तेव्हा न्यायाधीश कोहली यांनी हे पत्र मराठीत असल्याचं म्हटलं. यात सरन्यायाधीश चंद्रचूडचं काहीतरी मदत करू शकतात असं म्हटलं. त्यानंतर मराठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढाकार घेत शिवसेनेच्या बैठकीचं ते पत्र हातात घेतलं आणि कोर्टासमोर वाचून दाखवलं. तसंच यापत्रातील मजकूराची माहिती सर्वांना भाषांतर करुन सांगितली. 

कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेनेची निवडणूक २३ जानेवारी २०१८ मध्ये झाली होती. तर  राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही २०१८ मध्ये झाली होती. तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेनेत चौथ्या क्रमांकाचे नेते होते. काहींची नेमणूक झाली काही निवडून आले, ही माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. पण घटनाच मान्य नाही असे निवडणूक आयोग आता म्हणतेय, असे बोट सिब्बल यांनी ठेवले.

तसेच २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये ठाकरे मुख्यमंत्री नाही तर पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळाले तरी ते पक्षाचे अध्यक्षच होते. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार देण्यात आले. याच बैठकीत एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड. याच बैठकीत सुनील प्रभुंची प्रतोद म्हणून निवड आमदार पक्षचिन्हाच्या जोरावर निवडून येतात, असे सिब्बल यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. 

सरन्यायाधीश चंद्रचूड महाराष्ट्राचे सुपुत्र
चंद्रचूड परिवाराचा पुणे शहराशी जवळचा ऋणानुबंध राहिला आहे. त्यांचे मूळ गाव कणेरसर (ता. खेड) येथील वाडा तर अजूनही अस्तित्व ठेवून आहे. कणेरसर येथील वाड्यात चंद्रचूड यांचे नातेवाईक आजही राहतात. गावातील काहीजणांनी सांगितले की, यशवंतरावांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सन १९१२ मध्ये त्यावेळच्या एलएल.बी.च्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आले होते. त्यांच्यानंतर यशवंतराव सन १९४२ मध्ये व नंतर त्यांची मुलगी १९७१ मध्ये याच परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आली होती.

Web Title: Decision letter of Shiv Sena meeting in Marathi Chief Justice dy chandrachud read it for court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.