गुलाबराव यांच्यासह सहा जणांचे तैलचित्र लागणार बाजार समितीचा निर्णय : लकी टेलर यांचा सेनेला पाठींबा
By admin | Published: December 12, 2015 06:33 PM2015-12-12T18:33:50+5:302015-12-12T18:33:50+5:30
जळगाव- बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, गुलाबराव देवकर आणि भिलाभाऊ सोनवणे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय शनिवारी बाजार समितीच्या संचालकांनी मासिक बैठकीत घेतला.
Next
ज गाव- बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, गुलाबराव देवकर आणि भिलाभाऊ सोनवणे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय शनिवारी बाजार समितीच्या संचालकांनी मासिक बैठकीत घेतला. सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी, प्रभाकर पवार, सिंधूबाई पाटील, सरला पाटील, विमलबाई भंगाळे, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), अनिल भोळे, वसंत भालेराव, मनोहर पाटील, भरत पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते. सेनेचे दोघे गैरहजरबैठकीत शिवसेनेचे प्रभाकर सोनवणे, शशिकांत बियाणी अनुपस्थित होते. तसेच व्यापारी प्रतिनिधी नितीन बेहेडेदेखील अनुपस्थित राहीले. सभापतींची विषय तहकूब करण्याची सूचनाआमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्याचा विषय तहकूब ठेवा. नंतर तो घेऊ, अशी भूमिका सभापती नारखेडे व प्रभाकर पवार यांनी मांडली. लकी टेलर, उपसभापतींचा नकारआमदार पाटील यांचे तैलचित्र लावण्याचा विषय याच बैठकीत मंजूर करा. गुलाबराव यांचे तैलचित्र लागेलच, अशी भूमिका उपसभापती कैलास चौधरी व लकी टेलर यांनी मांडली. त्यास भरत बोरसे, सिंधूबाई पाटील, अनिल भोळे, भरत धनाजी पाटील, सरला पाटील यांनी पाठिंबा दिला. अर्थातच शिवसेनेच्या बाजूने लकी टेलर यांच्या पॅनलचे संचालक आल्याने भाजपाची मंडळी नरमली. मग सुरेश भोळेंचे तैलचित्रही लावागुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावायचे असेल तर आमदार भोळेंचे तैलचित्रही लावा, असे सभापती नारखेडे म्हणाले. त्यानंतर उपसभापती चौधरी यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेही तैलचित्र लावा, अशी भूमिका मांडली. यातच आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, गुलाबराव देवकर व भिलाभाऊ सोनवणे यांचे तैलचित्र लावण्याचाही विषय आला. त्यास संचालकांनी मंजुरी दिली. संग्रहालय व्हायला नकोबाजार समितीमध्ये ज्येष्ठ नेत्यांचे, विचारवंतांचेच तैलचित्र सभागृहात लागायला हवेत. असेच सुरू राहीले तर सभागृहाचे तैलचित्र होईल, असे प्रभाकर पवार म्हणाले. खडसे, गुलाबराव यांचे तैलचित्र एकाच वेळी लागायला हवे होतेज्येष्ठ संचालक भरत बोरसे म्हणाले, महसूलमंत्री खडसेंचे तैलचित्र लागले त्या वेळेस काहीच मुद्दा आला नाही. त्याच वेळी आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्रही लावायला हवे होतेे. दंगा नियंत्रण पथकसभा वादळी होईल, वाद होतील ही बाब लक्षात घेता बाजार समितीच्या आवारात दंगा नियंत्रण पथक बोलाविण्यात आले होते. १५ कर्मचारी त्यात होते. सभागृहानजीक चार कर्मचारी होते. २५ वर्षातप्रथमचपोलीसबंदोबस्तातबैठकहोतअसल्याचीप्रतिक्रियाजुन्यासंचालकांनीदिली.