मल्ल्यांविरुद्धच्या कारवाईबाबत ईडी घेणार सोमवारी निर्णय

By admin | Published: April 10, 2016 03:17 AM2016-04-10T03:17:36+5:302016-04-10T03:17:36+5:30

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही मद्यसम्राट विजय मल्ल्या चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणते कायदेशीर पाऊल उचलायचे, याचा निर्णय आम्ही सोमवारी घेणार

Decision on Monday for taking action against Mallya | मल्ल्यांविरुद्धच्या कारवाईबाबत ईडी घेणार सोमवारी निर्णय

मल्ल्यांविरुद्धच्या कारवाईबाबत ईडी घेणार सोमवारी निर्णय

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही मद्यसम्राट विजय मल्ल्या चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणते कायदेशीर पाऊल उचलायचे, याचा निर्णय आम्ही सोमवारी घेणार आहोत, असे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. मल्ल्या हे युबी ग्रुपचे अध्यक्ष असून कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणातील आरोपी आहेत.
ईडी ही केंद्रीय संस्था एखाद्या आरोपीला साधारणपणे तीनवेळाच समन्स पाठविते. मल्ल्या यांना आणखी एक समन्स पाठवून आपल्यासमोर हजर होण्यासाठी वेळ द्यावा किंवा नाही याबाबत ईडीचे अधिकारी सोमवारी खल करतील, असे सूत्रांनी सांगितले. ईडीने बजावलेल्या तिसऱ्या समन्समध्ये मल्ल्या यांना शनिवारी संस्थेच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले होते.
तत्पूर्वी ईडीने कोट्यवधी रुपयांच्या आयडीबीआय कर्ज घोटाळ््या प्रकरणी मल्ल्यांना दोनवेळा समन्स पाठविले होते. मात्र, मल्ल्या हजर झाले नाहीत. कर्ज परतफेडीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली आपल्या वाटाघाटी सुरू असल्याचे कारण सांगून मल्ल्या यांनी हजर होण्यासाठी मेपर्यंतची मुदत ईडीकडे मागितली होती.
मल्ल्या यांच्याकडे बँकांची ९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ४ हजार कोटी रुपये सप्टेंबरपर्यंत परतफेड करण्याची तयारी मल्ल्या यांनी दाखविली आहे; मात्र चालू आठवड्याच्या पूर्वार्धात बँकांच्या महासंघाने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आता त्यांचा पासपोर्ट जप्त करून घेणे आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करणे हा एक पर्याय ईडीसमोर आहे. ‘ईडी’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मल्ल्या यांच्याविरुद्ध काय करायचे याचा निर्णय आम्ही सोमवारी किंवा पुढील आठवड्यात केव्हा तरी घेऊ. सामान्य परिस्थितीत आम्ही तीनपेक्षा जास्त समन्स धाडत नाही; पण मल्ल्या यांना आणखी एक समन्स बजावण्याच्या प्रस्तावावर आम्ही विचार करीत आहोत. याशिवाय आणखी एक पर्याय म्हणून इंटरपोलला त्याची माहिती देणे आणि ‘लूक आऊट’ नोटीस जारी करणे; त्यामुळे जेव्हा मल्ल्या अन्य देशांत जाण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना पकडले जाऊ शकते.
याप्रकरणी ‘ईडी’ने आतापर्यंत किंगफिशर एअरलाईन्सचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) ए. रघुनाथन आणि युनायटेड ब्रेव्हरीजचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी रवी नेदुगदी यांची चौकशी केली आहे. याशिवाय मल्ल्या यांच्याकडील कर्जवसुलीसाठी काय पद्धती अवलंबविली? याबाबत ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली आहे.

Web Title: Decision on Monday for taking action against Mallya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.