‘नीट’च्या निर्णयापासून केंद्राचा घूमजाव?; पेन-पेपरचाच वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:22 AM2018-08-11T05:22:39+5:302018-08-11T05:22:42+5:30

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) ही पुढील वर्षापासून आॅनलाइन स्वरूपात तसेच वर्षातून दोनदा घेण्याच्या निर्णयापासून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर घूमजाव करण्याची शक्यता आहे.

From the decision of 'Neat', the center rotation ?; Use pen-paper only | ‘नीट’च्या निर्णयापासून केंद्राचा घूमजाव?; पेन-पेपरचाच वापर

‘नीट’च्या निर्णयापासून केंद्राचा घूमजाव?; पेन-पेपरचाच वापर

Next

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) ही पुढील वर्षापासून आॅनलाइन स्वरूपात तसेच वर्षातून दोनदा घेण्याच्या निर्णयापासून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर घूमजाव करण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय प्रवेशांसाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा सध्या लेखी स्वरूपात घेण्यात येते. तो प्रघात पुढील वर्षीही कायम ठेवण्याच्या प्रस्तावावर आरोग्य व मनुष्यबळ विकास मंत्रालयांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. नीट तसेच इंजिनीअरिंगसाठी जेईई-मेन परीक्षा नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या माध्यमातून घेण्याचा मनोदय होता. परीक्षा आॅनलाइन झाल्यास ग्रामीण व गरीब परीक्षार्थींना अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी टीकाही झाली होती. निर्णयाआधी चर्चा करण्यात आली नव्हती, असा आक्षेप घेणारे पत्र आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे.

Web Title: From the decision of 'Neat', the center rotation ?; Use pen-paper only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.