शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी करण्याचा पंजाब सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 10:35 PM2018-07-04T22:35:18+5:302018-07-04T22:36:40+5:30
राज्यातील अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी पंजाब सरकराने पावले उचचली आहेत.
चंदीगड - राज्यातील अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी पंजाब सरकराने पावले उचचली आहेत. आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापुढे पंजाबमध्ये शासकीय नियुक्तीपूर्वी कर्मचाऱ्यांना उत्तेजक चाचणी द्यावी लागणार आहे.
अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव पंजाब सरकारने काही दिवसांपूर्वीच तयार केला होता. त्यानंतर आता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नियुक्तीवेळी कर्मचाऱ्यांना उत्तेजक चाचणी द्यावी लागणार आहे. तसेच नियुक्तीनंतरही अशा प्रकारची चाचणी होईल.
Punjab CM Capt Amarinder Singh has ordered mandatory dope test of all govt employees, including police personnel, from the time of their recruitment through every stage of their service. He directed the Chief Secy to work out modalities & have the necessary notification issued. pic.twitter.com/7iTGurmM7G
— ANI (@ANI) July 4, 2018
अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव पंजाब सरकारने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, आता केंद्राने मंजुरी दिल्यास राज्यातील अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.