उजनीतून 14 सप्टेंबरनंतर पाणी सोडण्याचा निर्णय
By admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:37+5:302015-09-03T23:05:37+5:30
जिल्हाधिकारी: सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडणे यापुढे अशक्य
Next
ज ल्हाधिकारी: सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडणे यापुढे अशक्यसोलापूर: सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून भीमा नदीद्वारे 14 किंवा 15 सप्टेंबरला पाणी सोडले जाईल़ साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ सूक्ष्म नियोजन करुन मोहोळसाठी भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाल़े उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याबाबत मुंबईत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी बैठक बोलावली होती़ या बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ गणपतराव देशमुख, आ़ सुभाष देशमुख, आ़ दीपक साळुंखे, आ़ दिलीप सोपल, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, आ़ भारत भालके, आ़ बबनराव शिंदे, आ़ नारायण पाटील, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, ‘उजनी’चे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, ‘मनपा’चे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे आदी उपस्थित होत़े बर्याच दिवसांपासून विविध आमदारांकडून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला जात होता़ एनटीपीसीकडून उजनी ते आहेरवाडी अशी दुहेरी जलवाहिनी टाकण्यात येत आह़े ही योजना जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्यास याच जलवाहिनीद्वारे तूर्तास सोलापूरला पाणीपुरवठा करण्याचे देखील नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे म्हणाल़े सोलापूरला पाणी सोडल्यानंतर उजनी पाणीपातळी किती होईल, याचा सूक्ष्म विचार करुन नियोजन केले जात आह़े मोहोळसाठी पाणी सोडण्याबाबत देखील सकारात्मक विचार सुरू असून त्याचा निर्णय देखील दोन दिवसात घेतला जाईल, असे मुंढे म्हणाल़े नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर शहरावर येणारे जलसंकट तूर्तास तरी टळले आह़े महापालिकेने मात्र तातडीने समांतर जलवाहिनी करावी, 20 टीएमसी पाणी वाचल्यास शेतीसाठी हे पाणी वापरात येईल, असे मुंढे म्हणाल़े चौकट़़़मनपाने समांतर जलवाहिनी करावी सोलापूर शहराला नदीतून वर्षातून चार पाळ्या सोडाव्या लागतात़ यासाठी सुमारे 20 टीएमसी पाणी वाया जात़े पाऊस न पडल्यास कदाचित नदीद्वारे सोलापूरला हे शेवटचे पाणी सोडणार आह़े महापालिकेने तातडीने उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी टाकावी़ समांतर जलवाहिनी न टाकल्यास यापुढे सध्या असलेल्या उजनी ते सोलापूर जलवाहिनीतून येणार्या 70 एमएलडी पाण्यावरच नियोजन कराव़े जलसंपदा मंत्री शिवतारे यांनी देखील जिल्हाधिकार्यांच्या या सूचना मनपाला बजावल्या आहेत़