हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी
By admin | Published: November 10, 2016 04:05 PM2016-11-10T16:05:27+5:302016-11-10T16:05:27+5:30
मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे या शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 10 - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे या शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
देशाची सुरक्षा अजुनही कमकुवत आहे, सरकारने गरिबांचा विचार केलेला नाही, सरकारचं लक्ष शेतक-यांवर नसून केवळ मोठमोठ्या उद्योगपतींवर आहे. जनता सरकारवर नाराज असून केवळ उत्तर प्रदेश निवडणुकांवरून लक्ष हटवण्यासाठीच मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. या निर्णयामुळे भाजपला आर्थिक मजबुती मिळणार आहे. अजूनपर्यंत परदेशातून काळं धन आणलं नाही, नोटा बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. मोदींच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचं दैनंदिन जीवन प्रभावित झालं आहे अशी टीका त्यांनी केली.