देशविरोधात घोषणा देणे देशद्रोह की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ? - अमित शहा

By admin | Published: February 24, 2016 02:48 PM2016-02-24T14:48:37+5:302016-02-24T14:48:37+5:30

'भारत तेरे तुकडे होंगे' अशी घोषणा देणे हा देशद्रोह आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ? असा प्रश्न भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विचारला आहे

Declaration of the country against the freedom of expression of freedom? - Amit Shah | देशविरोधात घोषणा देणे देशद्रोह की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ? - अमित शहा

देशविरोधात घोषणा देणे देशद्रोह की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ? - अमित शहा

Next

ऑनलाइन लोकमत -
उत्तरप्रदेश, दि. २४ - 'भारत तेरे तुकडे होंगे' अशी घोषणा देणे हा देशद्रोह आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ? असा प्रश्न भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विचारला आहे. बहरिच येथील रॅलीला संबोधताना अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं आहे.


सध्या संसदेत देशाविरोधात घोषणा देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे की नाही ? यावर चर्चा सुरु आहे. मला काँग्रेस, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि इतर पक्षांना विचारायचं आहे की देशविरोधी घोषणांना ते समर्थन करतात का ? सर्व राजकीय पक्षांनी जेएनयूमध्ये देशाविरोधात देण्यात येणा-या घोषणांना आपण समर्थन करता की नाही हे स्पष्ट करावं. आणि जर समर्थन करत नसाल तर मग त्याचा निषेध करा असंही अमित शहा बोलले आहेत .   
 

Web Title: Declaration of the country against the freedom of expression of freedom? - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.