भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा

By Admin | Published: December 21, 2015 07:18 PM2015-12-21T19:18:16+5:302015-12-21T19:27:46+5:30

भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावा, अशी मागणी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत केली. भारतीय जनता पक्षाचे खासदार योगी आदित्यनाथ

Declare Bhagwat Gita a national book | भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा

भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावा, अशी मागणी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत केली. भारतीय जनता पक्षाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेच्या शून्यकाळात भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. 
जगभरात 'जिहादी' दहशतवादाचे जाळे पसरत असून यावर मात करण्यासाठी भगवत गीता शिकविणे अत्यंत गरजेचे आहे, यामुळे मानवताच्या कल्याणात भर पडेल असे खासदार आदित्यनाथ यांनी सांगितले.तसेच, देशभरातील सर्व शाळांमध्ये भगवत गीता शिकवण्यात यावे, असेही योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत सांगितले. या मुद्यावर भाजपच्या सर्व खासदारांनी पाठिंबा दर्शविला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी योगा आदित्यनाथ यांनी कुरुक्षेत्रमध्ये भगवत गीता महोत्सवाचे आयोजन केले होते. 

Web Title: Declare Bhagwat Gita a national book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.