मोदींची डिग्री जाहीर करा - केजरीवाल यांचे दिल्ली विद्यापीठाला पत्र
By admin | Published: May 5, 2016 04:19 PM2016-05-05T16:19:46+5:302016-05-05T16:19:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीए ची डिग्री जनतेला दाखवा अशी मागणी करणारे पत्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विद्यापीठाला लिहिले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीए ची डिग्री जनतेला दाखवा अशी मागणी करणारे पत्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विद्यापीठाला लिहिले आहे. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भातली माहिती विद्यापीठाने वेबसाईटवर जाहीर करावी.
निवडणूक लढवताना दिलेल्या माहितीमध्ये नरेंद्र मोदींनी दिल्ली विद्यापीठातून बीए केल्याचा दाखला दिल्याचा संदर्भ केजरीवाल यांनी दिला आहे.
मोदींकडे दिल्ली विद्यापीठाची डिग्री नसल्याचा केजरीवाल यांचा दावा आहे. देशाचा पंतप्रधान किती शिकलेला आहे, हे जाणुन घेण्याचा जनतेला अधिकार असल्याचं केजरीवाल यांचं म्हणणं आहे.
केजरीवाल यांनी मोदी यांच्याकडे पदवी नसून प्रसिद्ध झालेली मोदींच्या प्रमाणपत्रे बनावट असल्याचा आरोप केला आहे.
मोदींनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये बीए ची डिग्री तसेच पदव्युत्तर एमएची डिग्री घेतल्याचे म्हटले आहे. दूरस्थ शिक्षण घेत दिल्ली विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समधली डिग्री घेतल्याचे मोदींनी नमूद केले आहे. जर, मोदींकडे पदवीचं शिक्षणच नसेल तर पदव्युत्तर असूच शकत नाही, त्यामुळे दिल्ली विद्यापीठाने पदवी शिक्षणासंदर्भातली सगळी माहिती द्यावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्ली विद्यापीठाने मोदींची डिग्रीविषयक माहिती देण्यास असमर्थता दर्शवली असून केजरीवाल यांना पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा करण्यास सांगितले आहे. रोल क्रमांक माहिती नसेल तर रेकॉर्ड काढता येत नाही असे कारण विद्यापीठाने दिले आहे.
पंतप्रधान मोदी राज्यशास्त्रात एम.ए. - गुजरात विद्यापीठ
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक अर्हतेवरून शंकाकुशंकांना पेव फुटले असतानाच मोदी यांनी सुमारे ३३ वर्षांपूर्वी राज्यशास्त्रात एम.ए. ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत मिळविली असल्याचा खुलासा गुजरात विद्यापीठाने रविवारी केला. बाह्य विद्यार्थी म्हणून ही परीक्षा दिलेल्या मोदींना ६२.३ टक्के गुण मिळाले होते.
गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू एम.एन. पटेल यांनी ही माहिती देताना सांगितले की, नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी १९८३ साली राज्यशास्त्र या विषयात एम.ए. केले होते. त्या परीक्षेत मोदींनी ८०० पैकी ४९९ गुण मिळविले होते.