मृत घोषित करून व्यक्तीला शवागृहात ठेवलं; दुसऱ्या दिवशी पाहिलं तर दिसलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 01:45 PM2021-11-22T13:45:37+5:302021-11-22T13:46:12+5:30
UP Dead Man Found Alive : रस्ता अपघातात मृत घोषित केलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला शवागाराच्या डीप फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले होते, परंतु रुग्णालयाच्या शवागाराच्या फ्रीजरमध्ये एक रात्र काढल्यानंतरही ती व्यक्ती श्वास घेत असल्याचे पाहून नातेवाईकांना धक्का बसला.
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत घोषित केल्यानंतर शवागाराच्या फ्रीजरमध्ये ठेवलेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी जिवंत बाहेर आली. वास्तविक, रस्ता अपघातात मृत घोषित केलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला शवागाराच्या डीप फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले होते, परंतु रुग्णालयाच्या शवागाराच्या फ्रीजरमध्ये एक रात्र काढल्यानंतरही ती व्यक्ती श्वास घेत असल्याचे पाहून नातेवाईकांना धक्का बसला.
मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत झाली
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे मोटारसायकलच्या धडकेनंतर श्रीकेश कुमार यांना गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि त्यानंतर शुक्रवारी शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. त्याच्यामध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले.
डॉक्टरांची चूक की चमत्कार!
पोलिसांना कळवून मृतदेह शवगृहात ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांचे पथक आणि त्याचे कुटुंबीय शवविच्छेदनासाठी कागदोपत्री कामकाज सुरू करण्यासाठी आले असता तो जिवंत आढळला. हॉस्पिटलच्या शवागाराच्या फ्रीझरमध्ये एक रात्र घालवूनही, तो श्वास घेत होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. डॉक्टरांनी त्यांना चुकून मृत कसे घोषित केले, याचाही तपास सुरू आहे.