दुर्मीळ घटना; तीनदा घोषित केले मृत, तरीही जिवंत! जाणून घ्या, संपूर्ण प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 04:28 AM2021-11-21T04:28:23+5:302021-11-21T04:28:29+5:30
शुक्रवारी सकाळी पोलीस मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी रुग्णालयात आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, श्रीकेश यांचा श्वास सुरू आहे. पोलिसांनी डॉक्टरांना पाचारण केले. डाॅक्टरांनी तपासल्यानंतर ते जिवंत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर आता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुरादाबाद : तीन रुग्णालयांनी मृत घोषित केलेली एक व्यक्ती ७ तासानंतर जिवंत असल्याचे आढळून आले. ही घटना मुरादाबाद येथे घडली. श्रीकेश असे या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी रात्री वाहनाने धडक दिल्याने त्यांना साई हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्येही त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून पुन्हा मृत घोषित केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवून दिला. शुक्रवारी सकाळी पोलीस मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी रुग्णालयात आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, श्रीकेश यांचा श्वास सुरू आहे. पोलिसांनी डॉक्टरांना पाचारण केले. डाॅक्टरांनी तपासल्यानंतर ते जिवंत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर आता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुर्मीळ घटना -
- जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवसिंह यांनी सांगितले की, श्रीकेश यांना आमच्या रुग्णालयातील डॉ. मनोज यादव यांनी तपासून मृत घोषित केले होते. नंतर ते शवागारात जिवंत असल्याचे आढळून आले.
- अशा घटना वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळात दुर्मीळ असतात. औषधांचा परिणाम खूपच उशिरा झाल्याने असे प्रकार होतात.