देश परदेश-गीताला पाठविण्यास नकार
By Admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:45+5:302015-09-03T23:05:45+5:30
गीताचा ताबा देण्याची मागणी
ग ताचा ताबा देण्याची मागणी पाक न्यायालयाने फेटाळलीकराची : पाकिस्तानात असलेली मूक बधिर भारतीय मुलगी गीताचा (२३) ताबा मिळण्याची भारतीय सामाजिक कार्यकर्त्याची याचिका सिंध उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. गीताला सक्तीने भारतात पाठवून देण्याचे आदेशही न्यायालयाने देण्यास नकार दिला. हरियाणातील सामाजिक कार्यकर्ते मोमिनीन मलिक यांनी ही याचिका या न्यायालयात स्थानिक वकिलामार्फत केली होती. याचिकेत गीताला भारतात पाठविण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. तज्ज्ञामार्फत गीताने तिला भारतात जायचे आहे, असे न्यायालयाला सांगितले, असे जिओ न्यूजने म्हटले.गीताची देखभाल करणार्या एधी फाऊंडेशनच्या वकिलाने या प्रकरणात पाकिस्तान आणि भारत सरकारला सहभागी करून घ्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली होती. गीता ही आमची नातेवाईक असल्याचा दावा भारतातील पाच कुटुंबांनी केला आहे. सिंध उच्च न्यायालयाने दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी योग्य ती पद्धत या प्रकरणात अवलंबावी असे म्हटले.