नोटाबंदीमुळे घटली सोन्याची मागणी

By Admin | Published: February 3, 2017 04:53 PM2017-02-03T16:53:36+5:302017-02-03T16:53:36+5:30

नोटाबंदीच्या निर्णयामुळे मागच्यावर्षी 2016 मध्ये सोन्याच्या मागणीमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली.

Declined gold demand due to the annunation | नोटाबंदीमुळे घटली सोन्याची मागणी

नोटाबंदीमुळे घटली सोन्याची मागणी

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 3 - नोटाबंदीच्या निर्णयामुळे मागच्यावर्षी 2016 मध्ये सोन्याच्या मागणीमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली. सोन्याची मागणी सातवर्षांच्या नीचांकी पातळीला पोहोचली होती. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलने अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये भारताकडून 675.5 टन सोन्याची मागणी नोंदवण्यात आली. 
 
तेच 2015 मध्ये भारताने 857.2 टन सोन्याची मागणी नोंदवली होती. 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये 21.2 टक्के सोन्याच्या मागणीमध्ये घट झाली. भारतीय ग्राहकांनी कमीत कमी सोने खरेदी करावी यासाठी सरकारकडून विविध पावले उचलण्यात आली त्याचाही सोने खरेदीवर परिणाम झाला. 
 
सोने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती, उत्पादन शुल्क कर, नोटाबंदी तसेच उत्पन्न जाहीर करण्याच्या योजना या सर्वाचा सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला. 
 

Web Title: Declined gold demand due to the annunation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.