रेल्वे अपघातांच्या संख्येत घट

By admin | Published: July 19, 2014 02:23 AM2014-07-19T02:23:43+5:302014-07-19T02:23:43+5:30

रेल्वे क्रॉसिंगवरील घटना वगळता अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे.

Decrease in number of train accidents | रेल्वे अपघातांच्या संख्येत घट

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट

Next

नवी दिल्ली : रेल्वे क्रॉसिंगवरील घटना वगळता अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. २०१०-११ मध्ये अशा अपघातांची संख्या ९३ होती ती २०११-१२ मध्ये ७७ तर २०१२-१३ मध्ये ६८ वर आली आहे. २०१३-१४ मध्ये मात्र त्यात किंचित वाढ होऊन ती ७१ झाली, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.
गेल्या काही वर्षांत रेल्वेचे वारंवार अपघात झाल्याचे पाहता सुरक्षा अहवाल निष्प्रभ ठरले. छपरा येथे राजधानी एक्स्प्रेस घसरल्यानंतर गेल्या दोन वर्षांत किती अपघात झाले? रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय करण्यात आले, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. २०१२-१३ या वर्षी रेल्वे धडकण्याच्या ६ घटना घडल्या. याच श्रेणीतील अपघात २०१३-१४ या वर्षात ४ वर आले. यावर्षी ३० जूनपर्यंत केवळ एक घटना घडली आहे. २०१२-१३ मध्ये रेल्वे घसरल्यामुळे ४९ अपघात झाले. २०१३-१४ मध्ये अशा ५३ दुर्घटना झाल्या. यावर्षी जून ३० पर्यंत या दुर्घटनांची संख्या ३० आहे. गेटमन क्रॉसिंगवरील अपघात, रेल्वेतील आगीच्या घटना आणि अन्य किरकोळ दुर्घटनांची माहितीही त्यांनी दिली.
२०१२-१३ या वर्षात अपघातांची संख्या १६ होती. त्याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी झाली. विभागीय समितीने अन्य ५२ अपघातांची चौकशी केली. २०१३-१४ या वर्षातील याच काळात अशा दोन्ही अपघातांची आकडेवारी ९ आणि ६२ होती. यावर्षी ३० जूनपर्यंत ही संख्या ४ आणि २२ एवढी होती. गेल्या दोन वर्षांत तसेच यावर्षी ३० जूनपर्यंत १६६ पैकी ११५ घटनांची चौकशी समितीने केली आहे. दोषी ३२६ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली. रेल्वेमध्ये आरपीएफ, जीआरपी तसेच जिल्हा पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा असते, असेही रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Decrease in number of train accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.