कमी वयात लग्न केल्याने घटते उंची - जितनराम मांझी
By admin | Published: October 13, 2014 07:51 PM2014-10-13T19:51:11+5:302014-10-13T19:54:02+5:30
कमी वयात लग्न झाल्यानेत आपल्याकडील लोकांची उंची घटली असे अजब तर्कशास्त्र मांझी यांनी मांडले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १३ - बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी बेताल वक्तव्य करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. लग्नासाठी वयोमर्यादा २५ वर नेण्याची पाठराखण करताना कमी वयात लग्न झाल्याने आपल्याकडील लोकांची उंची घटली असे अजब तर्कशास्त्र मांझी यांनी मांडले आहे.
पाटणा येथील जनता दरबारात मुख्यमंत्री जितनराम मांझी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. मांझी म्हणाले, आश्रम पद्धतीनुसार माणसाच्या जीवनात २५ वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, ५० पर्यंत गृहस्थ, ७५ पर्यंत वानप्रस्थ आणि त्यानंतर संन्यास असे चार टप्पे असतात. यानुसार लग्नासाठी वयोमर्यादा २५ पर्यंत वाढवायला हवी. आता माणसाची उंची सात फुटांवरुन पाच फुटांपर्यंत का घटली ? असा सवाल उपस्थित करत याचा संबंध त्यांनी कमी वयात होणा-या लग्नाशी जोडला. निरोगी आयुष्य व कुपोषणावर मात करण्यासाठी मुलगा - मुलगी या दोघांचीही वयोमर्यादा २५ पर्यंत न्यायला हवी असे त्यांनी नमूद केले. माझे लग्नही २५ व्या वर्षी झाले असल्याने सत्तरी गाठूनही मला अद्याप औषधं घ्यावी लागलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मांझी यांनी मांडलेल्या 'तर्कशास्त्रा'मुळे उपस्थितही अवाक झाले होते.