दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना वर्षअखेरपर्यंत मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2015 12:36 AM2015-08-11T00:36:35+5:302015-08-11T00:36:35+5:30
म्हापसा, फोंडा येथे हायलिसी युनिट
Next
म हापसा, फोंडा येथे हायलिसी युनिट 261 पदे महिन्याभरात भरणार पणजी: दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना चालू वर्षाच्या आतच मार्गी लागेल, असे आश्वासन आरोग्यमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी सोमवारी विधानसभेत दिले. आरोग्य खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तरादाखल ते बोलत होते. या योजनेवर चर्चा विनिमयासाठी 40 ते 50 बैठका आजवर झालेल्या आहेत. ती आदर्श अशीच बनविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तोपर्यंत गरजवंतांना मेहिक्लेमचा लाभ आम्ही देत आहोत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. म्हापसा व फोंडा येथील सरकारी इस्पितळामध्ये डायलिसीस युनिट सुरू केले जाईल, परिचारिका, लॅब टेक्निसियन्स, सर्व्हंट आदी मिळून 261 पदे महिनाभरात भरली जातील. बांबोळी येथे मुलीच्या वसतीगृहाचे तसेच ले?र हॉलचे उद्घाटन येत्या 15 ऑगस्ट रोजी केले जाईल. अशा महत्त्वाच्या घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केल. आडिटोरियमचे काम ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. गोमेकॉत एनबीसीएसच्या 150 जागा कायम राहतील. एमसीओपेज या जागांना कधीही इन्कार केलेला नाही असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. गोमेकॉत 45 परिचारिकांची भरती केली जाईल. 557 पैकी 150 परिचारिका बाल संगोपनाच्या दीर्घ रजेवर असल्याचे ते म्हणाले. गोमेकॉत गरजूंना मोफत औषधांची सोय आहे. 24 कोटी 98 लाख त्यासाठी मंजूरही झालेले असून निविदा काढून औषधे आलेली आहेत. रूग्णांना बाहेरून ती खरेदी करण्याची सक्ती केली जात असेल तर त्याची चौकशी होईल, अशी हमी डिसौझा यांनी दिली. दक्षिण जिल्हा इस्पितळ दीड वर्षात दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी 1 सप्टेंबरपर्यंत वर्क ऑर्डर काढली जाईल. पुढील दीड वर्षात बांधकाम पूर्ण करून इस्पितळ सुरू करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे डिसौझा म्हणाले. गोमेकॉत शिकणार्यांकडून एमबीबीएस पदवीनंतर गोव्यात तीन वर्षे सेवा देण्याची हमी घेतली जाते. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांनतरही गोव्यात सेवा देण्याचे हमीपत्र घेतले जाते. परंतु ते पाळले जात नाही याकडे आमदारांनी लक्ष वेधले. काही आयुर्वेदीक किंवा होमिओपॅथिक डॉक्टर्स अँलोपॅथिक औषधे लिहून देतात. याकडेही आमदारांनी लक्ष वेधले. त्यात लक्ष घालू अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. 108 सेवेचे वाभाडे तत्पूर्वी आरोग्य खात्याच्या अनुदान मागण्यांवर कपात सूचना मांडताना विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणेयांनी 108 रूग्णवाहिका सेवेच्या निष्क्रीयतेचे वाभाडे काढले. दांडो, सांगे येथे दुचाकी अपघातात एका महिलेने आपल्या डोळ्यादेखत प्राण सोडले. रूग्णवाहिका वेळेत आलीच नाही. नेत्रावळी येथे रूग्णवाहिका होती. इस्पितळ सांगेत असताना रूग्णवाहिका इतक्या लांब का, असा सवाल त्यांनी केला. या महिलेला आपण वाचवू शकलो नाही याबद्दल आपल्याला अपराधी वाटते असे ते म्हणाले. आमदार विश्वजीत राणे यांनी अध्र्याहून अधिक 108 रूग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आणले. 45 लाख रुपये खचरून सरकारने 15 जणांना हैदराबादला पाठवून अँडव्हॉन्स पॅरामेडिकल्सचे प्रशिक्षण दिले होते. या सर्वांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. गोमेकॉत औषधांसाठी एकत्रित निविदा काढल्या जात आहेत. हे योग्य नव्हे. त्यामुळे कमी किमतीत औषधे मिळतील हा भ्रम आहे. गोमेकॉतील कॅथलॅब चालत नाही. साखळीत इस्पितळ बांधले पण तेथे साधी प्रसुतीही होत नाही. सरकारला डॉक्टर्स मिळत नसतील तर गोवा लोकसेवा आयोगाचे नियम शिथील करून बाहेरून डॉक्टर्स आणावेत, असा सल्ला त्यांनी दिला. गोमेकॉला दिलेल्या मोबाईल क्लिनिक काम करीत नाहीत. मेम्मोग्राफीसाठी दिवशी चारसुद्धा महिला येत नाहीत. अद्ययावत यंत्रणा पडून आहे. कार्डिओथोरॅसिससाठी हृदयरोगांना तारका दिला जातात अनेकदा विलंबामुळे रूग्ण दगावतात. मडगावच्या जिल्हा त्रस्पितळात 4 ऑपरेशन थिएटर्स आहेत परंतु एकही चालत नी. पीपीपी तत्त्वावर ती चालविण्यास द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. संशोधन विभागात घोटाळा : सरदेसाई आमदार विजय सरदेसाई यांनी गोमेकॉच्या संशोधन विभागात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा असल्याचा आरोप करून हे प्रकरण चौकशीसाठी दक्षता खात्याकडे सोपविण्याची मागणी केली. सरकारी तिजोरीत यावयाचे सोडून पैसे संशोधक डॉक्टरांच्या खिशात जातात असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात एका भाजप नेत्याचा भाऊ आहे. खासगी फार्मास्युटिकल्स कंपन्यांना हाताशी धरून हे सर्व चालले आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला. रूग्ण झोपतात जमिनीवर ऑस्पिसियो इस्पितळातील शवागरे नादुरुत आहेत. इस्पितळ रूग्णांना खाट मिळत नाहीत. जमिनीवर झोपविले जाते. कर्मचारीवर्ग पुरेसा नाही. 4 कन्सल्टंट, परिचारिकांचा तुटवडा आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. गोवा सरकार अजून केंद्राचा 2010 चा क्लिनिकल एस्टाबिशमेंट कायदा अंमलात का आणत नाही, असा सवाल त्यांनी केला. आमदार निलेश काब्राल यांनी गोमेकॉतून पदव्या घेऊन बाहेर पडणार्या डॉक्टरांकडून हमीपत्रे घेतली जातात. परंतु त्याचे पालन होते की नाही हे कोणी पाहत नाहीत, अशी तक्रार केले. एमबीबीएस पदवीनंतर किमान 1 वर्ष आणि पदव्युत्तर पदवीनंतर किमान 2 वर्षे गोव्यात काम करणे नियमिानुसार बंधनकारक असतानाही त्याचे पालन केले जात नाही. डॉक्टरांचा मुखवटा आहे. हमीपत्रांचे योग्य पालन केले जातेय याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली. शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे प्रकार आमदार मॉविन गुदिन्हो यांनी गोमेकॉत वेळोवेळी शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जातात. पुरेसा पाणी पुरवठा गोमेकॉत होत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतात. इस्पितळात घाण पसरलेली असते. याकडे लक्ष वेधले. अन्य आमदारांनीही गोमेकॉ, ऑस्पिसियो, म्हापशाचे जिल्हा इस्पितळ, अतिथ्य केंद्राच्या दुरवस्थेबाबत सभागृहाच्या निदर्शनास काही गोष्टी आणल्या. (प्रतिनिधी)*** गोमेकॉतील उपचार ***वर्षभरात 5 लशख 69, 229 रूग्णांना ओपीडीत उपचार घेतले तर 63,893 रूग्णांनी प्रत्यक्ष इस्पितळात भरती होऊन उपचार घेतले. कार्डिऑलॉजी विभागात 1436 चिकित्सा झाल्या. युरॉलॉजी 3058, नॅफ्रॉलॉजी - 6895, फासिए सर्जरी 14,468, न्युरॉलॉजी सर्जरी- 14,468 अशा शस्त्रक्रिया झाल्या. एकूण 40, 093 एक्स रे काढण्यात आले. कमर डॉफ्ट1,210 तर सीटी स्कॅन 18,693 झाले. दिवशी 1000 किलो जैव वैद्यकीय कर्मचार्यांची येथील हायड्रोक्लेव्हमध्ये शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली गोमेकॉच्या आवारातील जागेवर मंडूर, सांताक्रूझ या पंचायतींचाही दावा आहे. सर्वेक्षण करून जागेचा वाद कायचा मिटविला जाईल. गोमेकॉत शिक्षण घेतलेल्या व एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांनी गेल्या 3 वर्षात गोमेकॉत दिलेली सेवा अशी आहे. 2012-13 (45 डॉक्टर्स), 2013-14 (40 डॉक्टर्स), 2014-15 (30 डॉक्टर्स)