शाहरुखचा 'डर' पाहून केलं दिप्ती शर्माचं अपहरण
By admin | Published: February 15, 2016 02:32 PM2016-02-15T14:32:50+5:302016-02-15T14:45:55+5:30
शाहरुख-जुही चावलाच्या 'डर' चित्रपटातून प्रेरणा घेऊन त्याने केलं दिप्ती शर्माच अपहरण
ऑनलाइन लोकमत
गाजियाबाद, दि. 15 - स्नॅपडीलची कर्मचारी दिप्ती शर्मा अपहरण प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे चौकशीत आरोपीने शाहरुख खान - जुही चावलाच्या 1993च्या 'डर' चित्रपटातून प्रेरणा घेतल्याची माहिती दिली आहे.
दिप्तीच अपहरण झाल्यानंतर दोनच दिवसांत अपहरणकर्त्यांनी तिला काहीही इजा न करता सोडून दिल्याने तसंचं खंडणीचा कोणताही फोन न आल्याने अपहरणामागचं नेमक कारण काय होतं याचा पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पोलिसांना अगोदरपासून कोणीतरी ओळखीची व्यक्ती या अपहरणात सहभागी असल्याचा संशय होता. दिप्तीच अपहरण करण्यापुर्वी गेली 14 महिने अपहरणकर्ता दिप्तीवर लक्ष ठेवून होता. अपहरणकर्त्यांने दिल्ली मेट्रोमध्ये दिप्तीला पाहिल होतं त्यानंतर सलग तो तिच्यावर लक्ष ठेवून होता.
याअगोदरही चित्रपटातून प्रेरणा घेऊन चोरी, फसवणूक, हत्या झाल्याच्या घटना समोर आल्यात ज्यामध्ये धूम, खोसला का घोसला, मुन्नाभाई एमबीबीएस सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.