मेहरुण तलावाचे सुशोभिकरण की बड्या व्यक्ती सोय दीपक गुप्ता : चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी
By admin | Published: July 5, 2016 12:28 AM2016-07-05T00:28:50+5:302016-07-05T00:28:50+5:30
जळगाव : मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली या भागातील प्रभावशाली लोकांना एफएसआय (वाढीव चटई निर्देशांक) वाढवून देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून सुशोभिकरणाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल रोखावी या आशयाचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले आहे.
Next
ज गाव : मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली या भागातील प्रभावशाली लोकांना एफएसआय (वाढीव चटई निर्देशांक) वाढवून देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून सुशोभिकरणाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल रोखावी या आशयाचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले आहे.मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली त्या ठिकाणी असलेल्या प्रभावशाली लोकांना त्यांचा लाभ पोहचविला जात आहे. या प्रकरणी समिती गठीत करून प्राप्त होणारा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. या समितीने एक महिन्यात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश देण्यात यावे. मेहरुण तलावाच्या पाण्याचा स्त्रोत आजची स्थिती, तत्कालीन नकाशा, आजच्या स्थितीतील नकाशा, तलावाच्या आतमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून होणारी पाण्याची चोरी या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश या समितीला द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. एफएसआयचा लाभ कुणाला होत आहे, लोकसहभाग व शासन, मनपा यांच्या माध्यमातून किती काम झाले याची चौकशी करून हा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मेहरुण तलाव क्षेत्रात अंदाजे तीन हजार हिरव्या झाडांची होणारी कत्तलदेखील थांबविण्यात यावी. तलाव परिसरातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच परिसरातील २० ते २५ इमारती तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या आवश्यकतेनुसार तोडण्यात याव्या अशी मागणी गुप्ता यांनी निवेदनाद्वारे केली आहे.