सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील आरोपी दीपक टीनूला अटक; पोलिसांच्या ताब्यातून झाला होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 04:43 PM2022-10-19T16:43:09+5:302022-10-19T16:45:43+5:30
सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणातील पंजाब पोलिसांच्या ताब्यातील फरार झालेला आरोपी दीपक टीनू याला दिल्ली पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे.
नवी दिल्ली: सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणातील पंजाब पोलिसांच्या ताब्यातील फरार झालेला आरोपी दीपक टीनू याला दिल्ली पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. दीपक टिनू १ ऑक्टोबर रोजी पंजाबमधील मानसा येथून फरार झाला होता.
Sidhu Moose Wala murder case | Fugitive criminal Sandeep alias Tinu Haryana arrested from Ajmer, Rajasthan, by Special Cell. He had escaped from the custody of Punjab Police earlier. pic.twitter.com/Z7Tu4fVbOa
— ANI (@ANI) October 19, 2022
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील अटकेत असलेला गँगस्टर दीपक टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. टीनू याला चौकशीसाठी कपूरनाथ कारागृह येथून मानसा येथे आणण्यात आले होते. यावेळी त्याने पोलिसांना चकवा देत तो फरार झाला होता.
दीपक टीनू याने पंजाब पोलिसांना शस्त्रांची माहिती दिली होती, त्यामुळे पोलीस त्याला खासगी वाहनातून घेऊन चौकशीसाठी जात होते. त्यादरम्यान तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता.
Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील गँगस्टर टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार
दीपक टीनू हा सिद्धू मुसेवाला हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे बोलले जात आहे. मुसेवाला हत्येपूर्वी दोन दिवस दीपक टीनूचे लॉरेन्स बिश्नोई सोबत फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती पोलीस चौकशीत मिळाली आहे. दीपक टीनू हा मोठा गँगस्टर आहे. त्याने आतापर्यंत पंजाब, युपी आणि हरियाणामध्ये अनेक गु्न्हे केले आहेत. तो फरार झाल्यानंतर पंजाब पोलिसांच्यावर प्रश्न उपस्थितीत झाले होते.