5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळणार अयोध्या, बनणार जागतिक विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:26 AM2019-10-26T11:26:55+5:302019-10-26T11:31:06+5:30
दिवाळीच्या निमित्तानं अयोध्या आज 5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळून निघणार आहे.
नवी दिल्ली- दिवाळीच्या निमित्तानं अयोध्या आज 5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळून निघणार आहे. एका विश्वविद्यालयासह विविध महाविद्यालयांतील मुलं रामाचा चौथरा दिव्यांनी झळाळून टाकणार आहेत. मठ आणि मंदिरांना जवळपास दीड लाख दिव्यांनी लखलखीत करण्याची तयारी आहे. व्यापारी आणि सामान्य व्यक्तीही घरापासून शहरांपर्यंत दिव्यांची रोषणाई करणार आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचीही टीमसुद्धा अयोध्येत दाखल झाली आहे.
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. यावेळी जागोजागी आरएएफ, पीएसी आणि पोलीस, जवान तैनात आहेत. तसेच गुप्तचर विभागाची माणसंही पोहोचली आहेत. एसपी सिटी विजयपाल सिंह यांच्या माहितीनुसार, दुकानदारांना सवलत दिली जाणार आहे. दुकानं नेहमीसारखीच लावण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमामुळे रस्त्याच्या मार्गक्रमणात बदल केलेला असून, जड वाहनांना प्रवेश नाकारला आहे. दुसरीकडे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बिना भटनागर राहणार आहेत.
राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामकथा पार्कमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांचं स्वागत करणार आहेत. रामकथा पार्कमध्ये नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्सच्या गटांकडून रामलीलाची महती सांगितली जाणार असून, त्यासाठी लेजर शोच्या माध्यमातून रामकथेचे प्रसंग दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनाची सुरुवात शनिवारी सकाळी साकेत महाविद्यालयापासून रामकथा पार्कपर्यंत शोधायात्रा काढण्यापासून होणार आहे. संध्याकाळी 7 ते 7.30 वाजता हे दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शरयू मातेची आरती करणार असून, त्यानंतर शरयूच्या किनारी आतषबाजी केली जाणार आहे.