लोकशाहीला काळिमा : कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले
By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 12:32 PM2020-12-15T12:32:11+5:302020-12-15T12:49:43+5:30
Karnataka News : आज कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला.
बंगळुरू - सभागृहामध्ये गोंधळ, कागदपत्रे भिरकावणे हे गेल्या काही काळात देशातील संसदेपासून विधिमंडळांपर्यंत गेल्या काही काळात नित्याचेच बनले आहे. मात्र आज कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला. गोरक्षा कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले मदतभेद हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यातच दोन्ही बाजूच्या सभासदांनी थेट सभापतींच्या आसनापर्यंत धाव घेत सभापतींना त्यांच्या खुर्चीवरून उठवले.
#WATCH Karnataka: Congress MLCs in Karnataka Assembly forcefully remove the chairman of the legislative council pic.twitter.com/XiefiNOgmq
— ANI (@ANI) December 15, 2020
आज घडलेल्या घटनेबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार प्रकाश राठोड यांनी सांगितले की, भाजपा आणि जेडीएसने सभापतींना सभागृहाचे आदेश नसताना अवैधपणे खुर्चीवर बसवले. असे करून भाजपाने असंवैधानिक पाऊल उचलले. कॉंग्रेसने त्यांना खुर्चीवरून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर आम्हाला त्यांना खुर्चीवरून हटवावे लागले.
BJP&JDS made the Chairman sit in the Chair illegally when House was not in order. Unfortunate that BJP is doing such unconstitutional things. Congress asked him to get down from the Chair. We had to evict him as it was an illegal sitting: Congress MLC Prakash Rathod, Karnataka https://t.co/qmBZgiGrGgpic.twitter.com/oAE1QJc5RF
— ANI (@ANI) December 15, 2020