सोशल मीडियातील बदनामी ठरणार गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 05:51 IST2020-11-22T05:51:05+5:302020-11-22T05:51:54+5:30
केरळच्या राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली असून त्याद्वारे केरळ पोलीस कायद्यात हे कलम जोडले आहे.

सोशल मीडियातील बदनामी ठरणार गुन्हा
थिरुवनंतपुरम: केरळ सरकारने एक अध्यादेश काढून सोशल मीडियावरुन बदनामी करणे गुन्हा ठरविला असून दाेषींना
पाच वर्षांपर्यंत कारावासासह किंवा १० हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षेची तरतूद केली आहे.
केरळच्या राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली असून त्याद्वारे केरळ पोलीस कायद्यात हे कलम जोडले आहे. सोशल मीडियावरुन होणाऱ्या अशा प्रकारच्या वाढलेल्या घटनांबाबत केरळ सरकारने चिंता व्यक्त केली होती.