स्मृती इराणींच्या हस्ते पदवी घेण्यास एमबीए विद्यार्थ्याचा नकार

By Admin | Published: October 18, 2015 11:47 AM2015-10-18T11:47:26+5:302015-10-18T11:52:09+5:30

देशातील स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचे सांगत श्रीनगरमधील एमबीएच्या विद्यार्थ्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Defective MBA student to take degree in the hands of Smriti Irani | स्मृती इराणींच्या हस्ते पदवी घेण्यास एमबीए विद्यार्थ्याचा नकार

स्मृती इराणींच्या हस्ते पदवी घेण्यास एमबीए विद्यार्थ्याचा नकार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. १८ - देशातील स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचे सांगत श्रीनगरमधील एमबीएच्या विद्यार्थ्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे. साहित्यिकांपाठोपाठ आता विद्यार्थ्यानेही केंद्र सरकारविरोधात निषेधाचे हत्यार उपसल्याने मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

श्रीनगरमधील इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी या महाविद्यालयातून समीर गोजवारी या तरुणाने एमबीए केले असून या विद्यार्थ्यांचा १९ ऑक्टोबररोजी दीक्षांत सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात सहभागी होण्यास समीरने नकार दिला आहे. समीरने फेसबुकवर ही माहिती दिली आहे. देशभरातील ४१ लेखकांनी स्वातंत्र्यावर घाला जात असल्याच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले आहेत. आता मीदेखील दीक्षांत समारंभात पदवी स्वीकारणार नाही असे समीरन म्हटले आहे. 

समीरच्या फेसबुक स्टेटसवरुन बातम्या प्रसिद्ध होताच समीरने प्रसिद्धीसाठी हे विधान केलेले नाही, या विधानाचे राजकारण करु नये असे स्पष्टीकरण दिले आहे.  

Web Title: Defective MBA student to take degree in the hands of Smriti Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.