संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्वदेशी 'तेजस' लढाऊ विमानामधून भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:15 AM2019-09-19T11:15:40+5:302019-09-19T11:33:13+5:30

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानामधून उड्डाण केले.

Defence Minister Rajnath Singh flies in Tejas Aircraft | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्वदेशी 'तेजस' लढाऊ विमानामधून भरारी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्वदेशी 'तेजस' लढाऊ विमानामधून भरारी

googlenewsNext

बंगळुरू  - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानामधून उड्डाण केले. तेजय विमानातून उड्डाण करणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी उड्डाणानंतर व्यक्त केले. 

तेजसमधून अर्धा तास उड्डाण करून माघारी परतल्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, ''तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव आहे. हे विमान उत्तम आणि आरामदायक आहे. मी या उड्डाणाचा आनंद घेतला. अशा विमानाच्या निर्मितीसाठी मी एचएएल, डीआरडीओ आणि इतर संस्थांचे अभिनंदन करतो. आज आपण या विमानांची जगातील इतर देशांमध्ये निर्यात करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचलो आहोत.''

स्वदेशी बनावटीचे तेजस विमान युद्धादरम्यान, रणभूमीमध्ये शस्त्रास्त्रांचा मारा करण्यामध्ये तसेच शत्रुच्या क्षेपणास्त्रांचा सामना करण्यामध्ये सक्षम आहे. हवेत उड्डाण करण्यात आणि  युद्धामध्ये हलकी लढाऊ विमाने अधिक यशस्वी ठरतात. तेजस हे त्याच श्रेणीतील आहे. हे विमान पाकिस्तान आणि चीनकडे असलेल्या या श्रेणीमधील विमानांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. 



भारतीय बनावटीचे तेजस हे हलक्या जातीचे विमान 
भारतीय बनावटीच्या तेजस हे हलक्या जातीचे विमान आहे. या विमानाची संकल्पना 1983 मध्ये समोर आली होती. त्यानंतर दहा वर्षांनी 1993 मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड (HAL) या कंपनीने केली आहे. 

म्हणून तेजसचे वजन आहे कमी 
स्वदेशी बनावटीचे तेजस हे हलक्या विमानांच्या श्रेणीमधील लढाऊ विमान आहे. या विमानाचे आवरण कार्बन फायबरपासून बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे धातूपासून बनवण्यात येणाऱ्या विमानांच्या तुलनेत हे विमान वजनाने खूप हलके आहे. मात्र वजनाने हलके असले तरी इतरक विमानांच्या तुलनेत हे विमान अधिक मजबूत आहे. 

 

Web Title: Defence Minister Rajnath Singh flies in Tejas Aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.