राजनाथ सिंह थोड्याच वेळात करणार महत्त्वाची घोषणा; संरक्षण मंत्रालयाकडून ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 09:25 AM2020-08-09T09:25:33+5:302020-08-09T09:50:38+5:30

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार आहेत. भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  

Defence Minister Rajnath Singh make important announcement at 10.00 am today | राजनाथ सिंह थोड्याच वेळात करणार महत्त्वाची घोषणा; संरक्षण मंत्रालयाकडून ट्विट

राजनाथ सिंह थोड्याच वेळात करणार महत्त्वाची घोषणा; संरक्षण मंत्रालयाकडून ट्विट

Next

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने रविवारी सकाळी (9ऑगस्ट) याबाबत ट्विट केले आहे. राजनाथ सिंह सकाळी दहा वाजता महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

पँगाँग त्सो व डेपसांग क्षेत्रात चिनी सैनिकांनी स्व-हद्दीत मागे जाण्यावर भारत ठाम आहे. शनिवारी दिवसभर लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान भारताने पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला. गलवान खोरे व झटापट झाली त्या ठिकाणाहून चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत मागे हटले आहेत, मात्र पँगाँग सरोवराच्या हद्दीतून सैनिकांना मागे येण्याचे आदेश अद्याप चीनने दिले नाहीत. भारतीय अधिकाऱ्यांनी याचीच आठवण चिनी अधिकाऱ्यांना करून दिली. जूनमधील हिंसक झटापटीनंतर सलग सहाव्यांदा दोन्ही बाजूंचे अधिकारी चर्चा करीत आहेत.

मागील आठवड्यात लेफ्टनंट जनरल अधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक स्व-हद्दीतून ठरलेल्या ठिकाणी सैन्य माघारीचा पुनरूच्चार भारताने वारंवार केला. प्रत्येक चर्चेदरम्यान सकारात्मक संवादाचा आव आणणाऱ्या चीनने प्रत्यक्षात ही मागणी मान्य केली नाही. गलवान खोऱ्यावर हक्क सांगणाऱ्या चीनने स्वहद्दीत माघार घेतली असली तरी अद्याप पँगाँग सरोवर हाच चर्चेचा मद्दा आहे. फिंगर पॉईंट 4, गोगरातून चिनी सैन्य मागे हटले. फिंगर पॉईंट 8 जवळूनही सैन्य माघारी परतले. सैन्य पूर्ण मागे हटल्याशिवाय चर्चेस अर्थ राहणार नाही, असेही भारताने आतापर्यंतच्या चर्चेदरम्यान सुनावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

माणुसकीला काळीमा! रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला बेदम मारहाण, Video व्हायरल

JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक

Web Title: Defence Minister Rajnath Singh make important announcement at 10.00 am today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.