तीन महिन्यांत देशाला मिळणार नवे लष्करप्रमुख; तीन नावं शर्यतीत आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 01:09 PM2019-09-26T13:09:54+5:302019-09-26T13:10:09+5:30

भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.

defence ministry starts next army chief appointment process | तीन महिन्यांत देशाला मिळणार नवे लष्करप्रमुख; तीन नावं शर्यतीत आघाडीवर

तीन महिन्यांत देशाला मिळणार नवे लष्करप्रमुख; तीन नावं शर्यतीत आघाडीवर

Next

नवी दिल्लीः भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे लष्कर प्रमुखांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतला जात आहे. नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून, यासाठी सध्या तीन नावे आघाडीवर आहेत. नव्या लष्कर प्रमुखांच्या शर्यतीत लेफ्टनंट जनरल एमएम नरावने, लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह आणि लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांची नावं आघाडीवर आहेत. खरं तर विद्यमान लष्कर प्रमुखांच्या निवृत्तीच्या चार-पाच महिन्यांपूर्वीच नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येते.

नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीत संरक्षण मंत्रालय हस्तक्षेप फार कमी असतो. नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटद्वारे गठीत करण्यात आलेली कमिटी घेणार आहे. या कमिटीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांपैकी फक्त अमित शहांचाच समावेश आहे.  नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीसाठी विद्यमान लष्कर प्रमुख निवृत्त होण्याच्या महिन्याभराचा किंवा 45 दिवसांचा अवधी असतो. परंतु आता लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानबरोबर तणावाची स्थिती असतानाच लष्कर प्रमुख निवृत्त होत आहेत. मोदी सरकारनं कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तान आधीच सैरभैर झाला असून, तो वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सुटला आहे, दुसरीकडे बालाकोटमध्ये पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवाद्यांचं तळ उभारतोय. तसेच भारतीय लष्करही पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी तयार असल्याचं विधानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. 

Web Title: defence ministry starts next army chief appointment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.