खुनातील आरोपीचा जामीन फेटाळला
By admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:44+5:302015-09-02T23:31:44+5:30
नंदनवन खुनातील आरोपीचा जामीन फेटाळला
Next
न दनवन खुनातील आरोपीचा जामीन फेटाळलानागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर एनआयटी घरकूलजवळच्या मैदानात झालेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. शुभम हिंगणेकर, असे आरोपीचे नाव आहे. पीयूष रवी टेंभेकर (२२), असे मृताचे नाव होते. तो भांडे प्लॉट येथील रहिवासी होता. २० मार्च २०१५ च्या सकाळी ७.३० वाजताच्या पूर्वी पीयूषचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा होत्या. पोलिसांनी घटनेच्या दिवशीच व्यंकटेशनगरच्या परिसरात आरोपींचा शोध घेतला असता शुभम हिंगणेकर आणि नीलेश हिवरे हे दोघे एका घरात लपताना आढळून आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता शुभमजवळ दोन मोबाईल आढळून आले होते. त्यापैकी एक मृत पीयूषचा होता. मोबाईलच्या मागे रक्ताचे डाग होते. त्याच्या अंगातील कपड्यावरही रक्ताचे डाग होते. नीलेशने खुनाची कबुली दिली होती. शुभमसोबत हा खून केल्याचे त्याने सांगितले होते. खुनात वापरलेला चाकू दडवून ठेवल्याचे त्याने सांगितले होते. तुटलेले क्रिकेटचे स्टम्प त्याच्याकडून जप्त करण्यात आले होते. सध्या दोन्ही आरोपी कारागृहात आहेत. त्यापैकी शुभमने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंदरे यांनी काम पाहिले.