तवांग संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ यांनी बोलावली बैठक, सीडीएसही राहणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:20 AM2022-12-13T10:20:30+5:302022-12-13T10:27:44+5:30

अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये काल चकमक झाल्याचे समोर आले. या चकमकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे.

Defense Minister Rajnath called a meeting on the Tawang conflict, CDS will also be present | तवांग संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ यांनी बोलावली बैठक, सीडीएसही राहणार उपस्थित

तवांग संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ यांनी बोलावली बैठक, सीडीएसही राहणार उपस्थित

Next

अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये काल चकमक झाल्याचे समोर आले. या चकमकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि सीडीएसही सहभागी होणार आहेत. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील उपस्थित राहणार आहेत.

9 आणि 11 डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत.

भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी करताहेत जिनपिंग? समोर येतंय असं कपटकारस्थान

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख राजनाथ सिंह यांना देशाच्या सर्व सीमेवरील सध्याच्या परिस्थितीची माहिती देणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.

तवांग संघर्षावर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचे वक्तव्यही समोर आले आहे. भारत एक शक्तिशाली देश म्हणून उदयास येत असल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे. जेव्हा आपण आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा त्यात कोणताही विरोधाभास नसावा. भगवान श्रीकृष्ण मथुरेचे होते पण रुक्मिणी भीष्मक नगर अरुणाचलचे होते. त्याला जोडण्याचे काम पीएम मोदींनी केले, यावरून हेही सिद्ध होते की अरुणाचल किती जुना भारताचा भाग आहे, असंही त्यांनी म्हटले आहे. 

चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं

भारतीय लष्कराने LAC वर चीनचा डाव पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से भागात भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये जोरदार चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय सैनिकांच्या तत्परतेने चिनी सैनिकांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या चकमकीत दोन्ही सैन्याचे काही जवान जखमी झाले. दरम्यान, त्या परिसरातील सॅटेलाइट फोटो समोर आला आहे. जिथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती.

Web Title: Defense Minister Rajnath called a meeting on the Tawang conflict, CDS will also be present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.