संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:45 PM2023-12-14T13:45:43+5:302023-12-14T13:46:38+5:30

संसद सभागृहात झालेल्या गोंधळानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

Defense Minister Rajnath Singh appeals to all MPs; Care should be taken while giving a pass to Parliament | संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी

संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी

नवी दिल्ली - देशाच्या संसदेतील सुरक्षा व्यवस्थेत बुधवारी मोठा गोंधळ झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संसद परिसरात मोठा पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सुरक्षा दल कसून तपासणी करत आहे. इतकेच नाही तर लोकसभा सचिवालयाने खासदारांना नवीन इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची 'स्मार्ट कार्ड' तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे देसाच्या संरक्षणमंत्र्यांनीही आज लोकसभा सभागृहात बोलताना सर्व खासदारांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. 

संसद सभागृहात झालेल्या गोंधळानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असलं तरी, यावरुन देशाच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चीन आणि पाकिस्तानच्या घुसखोरीचा उल्लेख करत या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत याविषयी बोलताना सर्वच पक्षाच्या खासदारांना आवाहन केलं. खासदारांकडून पास दिले जात असताना, ज्या व्यक्तींसाठी आपण पास देत आहोत, ती व्यक्ती सभागृहा कुठलाही अनुचित प्रकार करणार नाही, घडवणार नाही, याची खात्री करुनच पास द्यायला हवा, असे राजनाथसिंह यांनी म्हटले. तसेच, घडलेल्या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे, लोकसभा अध्यक्षांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, सर्वच खासदारांनी जबाबदारीने आणि काळजीने पासचं वाटप केलं पाहिजे, असेही सिंह यांनी म्हटले. 

संजय राऊतांकडून देशाच्या सीमावरुन प्रश्न

देशाच्या संसदेतील सुरक्षेत अशाप्रकारे गोंधळ उडत असेल, तर देशाची सुरक्षा आणि सीमारेषेवरील स्थिती आपण समजू शकतो. लडाखने चीनच्या सैन्याने कशारितीने घुसकोरी केली, काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसकोर कशारितीने घुसकोरी करत असतील हे काल देशाना कळालं. मणीपूरमध्ये बाहेरुन दहशतवादी कसे आले असतील हे काल लक्षात आलं, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी संसद भवनातील घुसकोरीवर बोलताना देशाच्या सुरक्षांचा आणि सीमारेषांचा प्रश्न उपस्थित केला. 

संसदेत स्मार्टकार्डवरुनच एंट्री

लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभा लॉबी आणि संसदेच्या संकुलातील इतर काही ठिकाणी फेशियल रेकग्निशन सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आली. सचिवालयाने म्हटले आहे की, अनेक सदस्यांकडे स्मार्ट कार्ड आहेत, ज्यांनी व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टमसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती करून घ्यावी. याशिवाय पुढील आदेश येईपर्यंत व्हिजिटर पास बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. संसदेच्या आत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. टोपी व बूट काढून तपासणी केली जात आहे.
 

Web Title: Defense Minister Rajnath Singh appeals to all MPs; Care should be taken while giving a pass to Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.