CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 08:56 AM2020-07-17T08:56:10+5:302020-07-17T08:56:32+5:30
राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्यावर आहेत.
लडाख- गलवान खोऱ्यातील चीन अन् भारतीय जवानांमधील रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपीन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणेही यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी लेहमध्ये दाखल झाले आहेत. राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्यावर आहेत. (Defence Minister Rajnath Singh leaves for Leh)
दौर्याच्या पहिल्या दिवशी राजनाथ सिंह लडाखमध्ये असतील, तर शनिवारी ते जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरला जाणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या परिस्थितीत दोन आठवड्यांपूर्वी (3 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अचानक लडाख दौरा केल्यानं सर्वच आश्चर्यचकित झाले होते, तसेच लडाखमधूनच मोदींनी चीनला कडक संदेश दिला होता. चीनसोबत तणावानंतर संरक्षणमंत्र्यांचाही हा पहिलाच दौरा आहे. मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही भागांना भेटी देईन. सीमा भागात तैनात सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहे” असे ट्विट राजनाथ यांनी केले.
Defence Minister Rajnath Singh, Chief of Defence Staff General Bipin Rawat and Army Chief General MM Naravane arrive at Leh Airport. Defence Minister is on a two-day visit to Ladakh and Jammu & Kashmir. pic.twitter.com/CXj2Pmoyu4
— ANI (@ANI) July 17, 2020
पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय पक्षांमध्ये नुकतीच चर्चेची चौथी फेरी झाली. याआधी 6 जून, 22 जून आणि 30 जूनला उच्चस्तरीय चर्चा झाल्या होत्या. मंगळवारपासून सुरू झालेली बैठक बुधवारी पहाटेपर्यंत लांबली होती. भारतीय आणि चिनी सैन्य दलाच्या कमांडर्समध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) ताणतणाव कमी करण्याच्या दिशेने चर्चा केली आहे.