संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले

By admin | Published: January 14, 2015 02:08 AM2015-01-14T02:08:38+5:302015-01-14T02:08:38+5:30

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘छुप्या युद्धाला’ भारत कठोरपणे उत्तर देईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकला ठणकावले आहे़

The Defense Minister stalled | संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले

संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले

Next

लखनौ : पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘छुप्या युद्धाला’ भारत कठोरपणे उत्तर देईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकला ठणकावले आहे़ देशाच्या सीमेवर घुसखोरी होऊ नये, यासाठी सरकार ठोस पावले उचलेल़ मी याची ग्वाही देतो, असेही ते म्हणाले़
मंगळवारी येथे पत्रकारांशी ते बोलत होते़ पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या कारवायांवर भारत सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे़ आम्ही एक ठोस भूमिका घेतली आहे़ याठिकाणी ही भूमिका, मी स्पष्ट करू शकणार नाही; पण येत्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष आकड्यांमध्ये बदल झालेला असेल़ खरे तर फरक आताही दिसतो आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६५ ते ७० टक्के अधिक अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ शेजारी देशांसोबत भारताला शांततापूर्ण संबंध हवे आहेत; पण सीमेपलीकडून छुप्या युद्धाचे प्रयत्न झाल्यास आम्हीही कठोर पावले उचलू, असे संरक्षणमंत्री म्हणाले़
पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग आणि घुसखोरी थांबवावी, तरच चर्चा शक्य आहे़ पाकिस्तान हे करणार नसेल तर चर्चेतून काहीही साध्य होणार नाही़
गुजरातेतील पोरबंदरच्या खोल समुद्रात भारतीय तटरक्षक दलाकडून पाठलाग सुरू असतानाच, स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेतील कथित अतिरेक्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याच्या बयाणाबाबत विचारले असता, पर्रीकर यांनी आपण असे म्हटलेच नसल्याचे सांगितले़ ते म्हणाले की, नौकेतील कथित अतिरेक्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे मी म्हटलेच नाही़
मी केवळ एवढेच म्हटले की, आत्मघातासाठी नौकेवरील दहशतवादी कुठलीही पद्धत स्वीकारू शकतात़ (वृत्तसंस्था)

 

Web Title: The Defense Minister stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.