महात्मा गांधी नव्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता; भाजपा आमदाराचा 'जय भीम'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 12:03 PM2019-04-30T12:03:29+5:302019-04-30T12:16:00+5:30

भाजपामध्ये अनेक वाचाळवीर असून, ते बऱ्याचदा वादग्रस्त विधानं करत असतात. 

dehradun bjp mla demanded to make bhimrao ambedkar father of the nation said does not believe in mahatma gandhi | महात्मा गांधी नव्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता; भाजपा आमदाराचा 'जय भीम'चा नारा

महात्मा गांधी नव्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता; भाजपा आमदाराचा 'जय भीम'चा नारा

googlenewsNext

नवी दिल्लीः भाजपामध्ये अनेक वाचाळवीर असून, ते बऱ्याचदा वादग्रस्त विधानं करत असतात. हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी महात्मा गांधींऐवजीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. तसेच महात्मा गांधी नव्हे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. चॅम्पियन यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना भेटून यासंदर्भात एक पत्रही दिलं आहे. तसेच त्यांनी हे पत्र राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. आमदार असलेले कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन म्हणाले, सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली व्यक्ती असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान बनवलं.


पण त्यासाठी दुसरीच व्यक्ती पात्र होती. तसेच चॅम्पियन यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल वादग्रस्त विधानही केलं आहे. काश्मीरला कलम 35 A आणि कलम 370 हे नेहरूंनीच दान दिलं आहे. 

Web Title: dehradun bjp mla demanded to make bhimrao ambedkar father of the nation said does not believe in mahatma gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.