निधीअभावी रखडले रस्ता दुरुस्तीचे काम देवळा : डांबरी रस्ताही उखडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ

By admin | Published: July 22, 2015 12:34 AM2015-07-22T00:34:02+5:302015-07-22T00:49:14+5:30

देवळा : येथील विंचूर-शहादा-प्रकाशा मार्गावर सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम निधीअभावी रखडलेले असून, तेथील डांबरी रस्ता उखडल्याने ते अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. यामुळे वाहनांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘ा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी व रखडलेले भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून प्रवासाची गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

Dehradun road repair work due to lack of funds: Due to the collapsing road, increase number of accidents | निधीअभावी रखडले रस्ता दुरुस्तीचे काम देवळा : डांबरी रस्ताही उखडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ

निधीअभावी रखडले रस्ता दुरुस्तीचे काम देवळा : डांबरी रस्ताही उखडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ

Next

देवळा : येथील विंचूर-शहादा-प्रकाशा मार्गावर सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम निधीअभावी रखडलेले असून, तेथील डांबरी रस्ता उखडल्याने ते अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. यामुळे वाहनांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘ा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी व रखडलेले भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून प्रवासाची गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
शहादा-प्रकाशा मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. ‘ा रस्त्याच्या दोन्ही बाजूला महाविद्यालय आहेत. तसेच ‘ा ठिकाणीच मुला-मुलींच्या दोन शाळा आहेत. रस्त्याने मालवाहतूक करणार्‍या व इतर वाहनांना मुले रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांची होणारी ही गैरसोय दूर व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने भुयारी मार्गाचे काम सुरू केले. यासाठी रस्ता उखडण्यात आला. भुयारी मार्गाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले परंतु इतर काम होणे बाकी असताना निधीअभावी काम रखडले. हा रस्ता राज इन्फ्रास्ट्रक्चर ‘ा टोल कंपनीच्या अखत्यारित आहे. उखडलेल्या रस्त्याची टोल कंपनीने कोणतीही दुरुस्ती केली नाही. ‘ा ठिकाणी रस्त्यावर मोठे नुकसान होते. अनेकवेळा वाहनांचे टायर फुटून अपघात झाले आहेत. एक महाविद्यालयीन विद्यार्थी जखमीदेखील झाला आहे. शाळा व महाविद्यालय सुटल्यावर येथे एकच गर्दी होते. यामुळे येथे एकच गोंधळ होतो व अपघात होण्याची शक्यता वाढते.
------

Web Title: Dehradun road repair work due to lack of funds: Due to the collapsing road, increase number of accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.