सर्व्हर डाऊनमुळे सोडतीला विलंब २५ टक्के प्रवेश : यादी अजूनही अप्राप्त

By Admin | Published: July 18, 2016 11:32 PM2016-07-18T23:32:13+5:302016-07-18T23:32:13+5:30

जळगाव : सर्व्हर डाऊन असल्याने प्रवेशासंबंधी पात्र विद्यार्थ्यांची माहिती

Delay due to server downline access to 25 percent: list still unread | सर्व्हर डाऊनमुळे सोडतीला विलंब २५ टक्के प्रवेश : यादी अजूनही अप्राप्त

सर्व्हर डाऊनमुळे सोडतीला विलंब २५ टक्के प्रवेश : यादी अजूनही अप्राप्त

googlenewsNext
गाव : सर्व्हर डाऊन असल्याने प्रवेशासंबंधी पात्र विद्यार्थ्यांची माहिती
संगणक किंवा यंत्रणेतून काढणे शक्य न झाल्याने सोमवारी २५ टक्के आरक्षण अंतर्गत १ ली व नर्सरीमध्ये मोफत प्रवेश देण्यासंबंधीची दुसरी सोडत निघू शकली नाही.

शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी व इतर शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी जून महिन्यात पहिली सोडत काढली होती. त्यातून १०२४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. आणखी ६१३ विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे आहेत. त्यासाठी दुसरी सोडत काढायची आहे. ही सोडत शिक्षण परिषद, पुणे येथे शिक्षण संचालक यांच्या निरीक्षणात काढायची आहे. परंतु या प्रक्रियेतून केलेल्या अर्जांची ऑनलाईन माहिती (डाटा) राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) यांच्याकडे आहे. ती माहिती सर्व्हर डाऊन असल्याने शिक्षण परिषदेला माहिती केंद्राकडून डाटा उपलब्ध करता आला नाही. त्यामुळे दुसरी सोडत काढला आली नाही. ही सोड न निघाल्याने प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची यादी शिक्षण विभाग आणि संबंधित शाळांनाही सोमवारी मिळू शकली नाही. परंतु दोन दिवसात ही माहिती उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती सर्व शिक्षा अभियानचे समन्वयक गुरुनंदन सूर्यवंशी यांनी दिली.

Web Title: Delay due to server downline access to 25 percent: list still unread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.