फक्त जेवणाच्या कारणावरुन पूर्ण वरात मागे गेली, वाचा लग्नाची ही अजब गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:33 PM2022-02-21T15:33:07+5:302022-02-21T15:35:18+5:30

नवरदेवाच्या कुटुंबातील सदस्यांना उशिरा जेवण वाढण्यात आल्याने थेट लग्नच मोडण्यात आलं (Groom Cancelled Marriage Due to Weird Reason). मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना पुर्णियाच्या मोहनी पंचायतच्या बटौना गावातील ईश्वरी टोला येथील आहे.

Delay in being served food irks groom in Bihar, refuses to get married | फक्त जेवणाच्या कारणावरुन पूर्ण वरात मागे गेली, वाचा लग्नाची ही अजब गोष्ट

फक्त जेवणाच्या कारणावरुन पूर्ण वरात मागे गेली, वाचा लग्नाची ही अजब गोष्ट

Next

आपण आजपर्यंत अनेक अशा घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील ज्यात अगदी विचित्र कारणामुळे ऐनवेळी लग्न मोडतं. सध्या अशीच एक अजब घटना बिहारमधून समोर आली आहे. यात नवरदेवाच्या कुटुंबातील सदस्यांना उशिरा जेवण वाढण्यात आल्याने थेट लग्नच मोडण्यात आलं (Groom Cancelled Marriage Due to Weird Reason). मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना पुर्णियाच्या मोहनी पंचायतच्या बटौना गावातील ईश्वरी टोला येथील आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमरी कुकरों येथील रहिवासी असलेला नवरदेव राजकुमार उरांव आपली वरात घेऊन ठरलेल्या वेळी लग्नसमारंभाच्या ठिकाणी पोहोचला. लग्नातील कार्यक्रम सुरू असल्याने नवरदेवाच्या कुटुंबातील सदस्यांना जेवायला वाढण्यास उशीर झाला. यामुळे नवरदेवाचे वडील इतके नाराज झाले की त्यांनी लग्नात येण्यासच नकार दिला आणि वरात घेऊन परतण्याचा निर्णय घेतला.

यानंतर स्थानिक लोक आणि पंचायतीने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि दोन्ही पक्षातील हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत नवरदेव तिथून फरार झाला होता आणि हे लग्न रद्द करावं लागलं. यादरम्यान नवरदेवाच्या वडिलांनी नवरीच्या वडिलांना जेवणाच्या खर्चासोबतच बाईक आणि नवरदेवाला मिळालेल्या इतर वस्तूंसाठीही भरपाई दिली. नवरीच्या आईने आता नवरदेव आणि त्याच्या वडिलांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे आणि प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

Web Title: Delay in being served food irks groom in Bihar, refuses to get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.