वाहतुक पोलिसाशी अरेरावी
By admin | Published: March 14, 2016 12:20 AM2016-03-14T00:20:54+5:302016-03-14T00:20:54+5:30
जळगाव: रस्त्याने जाताना आपसात भांडण करीत असलेल्या पती-पत्नीला हटकल्याने त्यांनी वाहतुक पोलिसांशी अरेरावी केली.त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावर शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वे स्टेशनजवळ घडला. वाहतुक शाखेचे सहायक फौजदार ढोले व हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे दोघं जण स्टेशन रोडवर ड्युटीला असताना कांचन नगरातील पती-पत्नी व त्यांच्यासोबत एक जण मुंबईला जाण्यासाठी स्टेशनवर जात असताना आपसात भांडण करीत होते. यावेळी चव्हाण यांनी दोघांना येथे वाद घालू नका, पुढे जा असे सांगितले असता दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसन रस्त्यावर अश्लिल शिवीगाळ करण्यात झाले. दोघं पोलिसांनी त्यांना शहर पोलीस स्टेशनला आणले. दोघंही एकमेकाविरुध्द तक्रार देण्यावर ठाम होते. पती चालक असून जळगावात काम नसल्याने ते मुंबईला जात होते, त्यांना सोडण्यासाठी स्टेशनवर जात असताना चव्हाण यांनी
Next
ज गाव: रस्त्याने जाताना आपसात भांडण करीत असलेल्या पती-पत्नीला हटकल्याने त्यांनी वाहतुक पोलिसांशी अरेरावी केली.त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावर शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वे स्टेशनजवळ घडला. वाहतुक शाखेचे सहायक फौजदार ढोले व हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे दोघं जण स्टेशन रोडवर ड्युटीला असताना कांचन नगरातील पती-पत्नी व त्यांच्यासोबत एक जण मुंबईला जाण्यासाठी स्टेशनवर जात असताना आपसात भांडण करीत होते. यावेळी चव्हाण यांनी दोघांना येथे वाद घालू नका, पुढे जा असे सांगितले असता दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसन रस्त्यावर अश्लिल शिवीगाळ करण्यात झाले. दोघं पोलिसांनी त्यांना शहर पोलीस स्टेशनला आणले. दोघंही एकमेकाविरुध्द तक्रार देण्यावर ठाम होते. पती चालक असून जळगावात काम नसल्याने ते मुंबईला जात होते, त्यांना सोडण्यासाठी स्टेशनवर जात असताना चव्हाण यांनी आपल्याला वाईट शब्द वापरला असा आरोप त्या महिलेने केला. दरम्यान, दोघांची समजूत काढण्याच्या कामामुळे रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झालेली नव्हती.