Delhi Corona : 14 मुले आढळली कोरोना पॉझिटिव्ह, सरकारने शाळांना दिल्या 'या' सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 02:07 PM2022-04-16T14:07:47+5:302022-04-16T14:08:35+5:30
Delhi Corona : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी आणि सरकारी रुग्णालयात एकूण 14 कोरोना पॉझिटिव्ह मुले दाखल आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीतील एका खाजगी शाळेत (Delhi Privet School) विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळल्यानंतर एकूण 14 मुलांना लागण झाली आहे. या सर्वांना राजधानीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी बहुतेकांना कॉमरेडिडिटी (एकापेक्षा जास्त रोग) आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी आणि सरकारी रुग्णालयात एकूण 14 कोरोना पॉझिटिव्ह मुले दाखल आहेत. कोरोनाच्या घटत्या प्रकरणानंतर शाळांमध्ये 1 एप्रिलपासून पूर्णपणे ऑफलाइन काम सुरू करण्यात आले होते. दरम्यान, दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानीतील शाळांसाठी (Delhi School) एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, ज्यामध्ये शाळांना सूचना दिल्या आहेत की जर एखादा विद्यार्थी किंवा कर्मचारी चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, संपूर्ण कॅम्पस किंवा ती विंग तात्पुरती बंद करावी. .
मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना म्हटले आहे की, विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, ज्यामध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवणे, हात स्वच्छ करणे, मास्क घालणे इत्यादींचा समावेश आहे. मात्र, दिल्लीस्थित एका डॉक्टरने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांना सौम्य लक्षणे आहेत. गेल्या दोन वर्षात तरुणांना कोरोनाचा खूप फटका बसला असून, त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास ठप्प झाला आहे. मुले ही कोणत्याही देशाची खरी गुंतवणूक असतात, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येतेय
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी हेल्थ बुलेटिनमध्ये दिल्लीत गेल्या 24 तासांत पॉझिटिव्ह दर 3.95 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, 366 कोरोनाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.