दिल्ली - आग्रा १०० मिनिटांत

By admin | Published: April 6, 2016 04:40 AM2016-04-06T04:40:57+5:302016-04-06T04:40:57+5:30

देशात मंगळवारी सेमी-हायस्पीड रेल्वेचे नवे पर्व सुरू झाले आहे. दिल्ली ते आग्रा २०० कि.मी.चा प्रवास अवघ्या शंभर मिनिटांत पूर्ण करणाऱ्या पहिल्या

Delhi - Agra in 100 minutes | दिल्ली - आग्रा १०० मिनिटांत

दिल्ली - आग्रा १०० मिनिटांत

Next

नवी दिल्ली : देशात मंगळवारी सेमी-हायस्पीड रेल्वेचे नवे पर्व सुरू झाले आहे. दिल्ली ते आग्रा २०० कि.मी.चा प्रवास अवघ्या शंभर मिनिटांत पूर्ण करणाऱ्या पहिल्या ‘गतिमान’ रेल्वेला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखविला. या रेल्वेचा पहिलावहिला प्रवासही प्रवाशांना सुखद धक्का देणारा ठरला. रेल्वेतील होस्टेसनी (रेल्वे सुंदरी) गुलाब पुष्पांनी त्यांचे स्वागत केले.
दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकावरून कर्णमधुर संगीताच्या साक्षीने या रेल्वेची चाके धावू लागली. अधिकाधिक १६० कि.मी.चा भन्नाट वेगही प्रवाशांना अनुभवता आला. प्रवाशांना विमान प्रवासाप्रमाणे आदरातिथ्य अनुभवता आले. ट्रेन होस्टेसकडून झालेले स्वागत, मिळालेले ‘कॉन्टिनेन्टल फूड’ असा एकूण थाट होता.(वृत्तसंस्था)

Web Title: Delhi - Agra in 100 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.