दिल्ली-आग्रा रेल्वे भाडे १ किलो सफरचंदाच्या किमतीपेक्षाही कमी!
By admin | Published: January 9, 2016 12:54 AM2016-01-09T00:54:59+5:302016-01-09T00:54:59+5:30
रेल्वेगाडीने दिल्लीहून आग्राला जाण्यास जेवढे प्रवासी भाडे द्यावे लागते त्यापेक्षा एक किलो सफरचंदाचे मोलही जास्त आहे.
नवी दिल्ली : रेल्वेगाडीने दिल्लीहून आग्राला जाण्यास जेवढे प्रवासी भाडे द्यावे लागते त्यापेक्षा एक किलो सफरचंदाचे मोलही जास्त आहे. रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीची माहिती देणारा एक चार्ट रेल्वेने प्रसिद्ध केला असून त्यात दैनंदिन वापराच्या काही वस्तूंच्या तुलनेत रेल्वेभाडे कसे कमी आहे, हे दर्शविण्यात आले आहे.
एका प्रवाशाला सामान्य श्रेणीत आग्रा येथून दिल्लीला जाण्यासाठी ८५ रुपये लागत असून हे भाडे एक किलो सफरचंदाच्या किमतीपेक्षा कमी आहे. चंदीगडला ७५ रुपयात पोहोचता येते. आणि १४० ग्रॅम टूथपेस्टसाठी सुद्धा यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. बसने प्रवास केल्यास नवी दिल्ली ते चंदीगड २६६ किमी अंतरासाठी ३५० रुपये तर येथून १९४ किमी दूर आग्राला जायचे असल्यास २८० रुपये बसभाडे द्यावे लागते. प्रवासी रेल्वेवाहतुकीसाठी दरवर्षी ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी देण्यात येते.