Delhi AIIMS: दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 04:17 PM2022-12-14T16:17:18+5:302022-12-14T16:17:47+5:30

Delhi AIIMS: हॉस्पिटलच्या 100 सर्व्हर्सपैकी 40 फिजिकल आणि 60 व्हर्चुअली हॅक करण्यात आले.

Delhi AIIMS: Cyber attack from China on servers of Delhi AIIMS, Home Ministry report reveals | Delhi AIIMS: दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा...

Delhi AIIMS: दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा...

googlenewsNext

Delhi AIIMS Server Attack:दिल्लीतीलएम्स रुग्णालयात झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा सायबर हल्ला चीनमधून झाल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयाच्या 100 सर्व्हरपैकी 40 फिजिकल आणि 60 व्हर्चुअली सर्व्हर हॅक करण्यात आले आहेत. यापैकी पाच सर्व्हरचा डेटा हॅकर्सकडून यशस्वीपणे परत मिळवण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) बुधवारी (14 डिसेंबर) ही माहिती दिली.

25 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटद्वारे खंडणी आणि सायबर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आता टार्गेट रॅन्समवेअर हल्ल्याची चौकशी करत आहे. एनआयएसोबतच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली सायबर क्राइम सेल, इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) देखील या सायबर हल्ल्याचा तपास करत आहेत.

एम्सवर सायबर हल्ला
AIIMS दिल्लीने पहिल्यांदा 23 नोव्हेंबर रोजी आपल्या सर्व्हरमध्ये खराबी नोंदवली. सर्व्हर राखण्यासाठी नेमलेल्या दोन अधिकाऱ्यांना सायबर सुरक्षा उल्लंघनाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. एम्सच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले की, ई-हॉस्पिटल डेटा परत मिळवण्यात आला आहे. सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी नेटवर्क क्लीन केले जात आहे. 

CFSL ची मदत घेतली
या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एम्स (Delhi AIIMS) दिल्ली येथील संगणक सिस्टीमवर झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरू केली होती. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल फॉरेन्सिक लॅब (CFSL) च्या टीमला मालवेअर हल्ल्याचा स्रोत ओळखण्यासाठी AIIMS दिल्लीच्या सर्व्हरची तपासणी करण्याची जबाबदारी दिली आहे.

Web Title: Delhi AIIMS: Cyber attack from China on servers of Delhi AIIMS, Home Ministry report reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.