एकाचवेळी दोन विमानांना टेक ऑफ आणि लँडिंगचे निर्देश; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:34 PM2023-08-23T15:34:37+5:302023-08-23T15:35:30+5:30

दिल्ली विमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना टळली. काहीकाळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

delhi airport, Instructions for simultaneous take-off and landing of two aircraft; A major accident was averted at Delhi airport | एकाचवेळी दोन विमानांना टेक ऑफ आणि लँडिंगचे निर्देश; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

एकाचवेळी दोन विमानांना टेक ऑफ आणि लँडिंगचे निर्देश; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

googlenewsNext

नवी दिल्ली: दिल्लीविमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना टळली. एकाच वेळी दोन विमानांना लँडिंग आणि टेक ऑफ करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, अपघात होण्यापूर्वीच विमान अडवण्यात आल्याने मोठा अपघात टळला. विस्तारा एअरलाईनचे हे विमान होते.

पश्चिम बंगालमधील बागदोरा येथे जाणार्‍या फ्लाइट क्रमांक UK725 ला बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळाच्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या धावपट्टीवरुन उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी अहमदाबादहून दिल्लीला जाणारे विस्तारा विमान उतरत होते. पश्चिम बंगालचे विमान टेक ऑफ करणार असतानाच अचानक एटीसीला फ्लाइट थांबवण्याच्या सूचना मिळाल्या. सूचना मिळताच विमान थांबले आणि काही मिनिटांतच अहमदाबाद विमान उतरले.

दोन्ही विमानांना एकाच वेळी परवानगी देण्यात आली, परंतु एटीसीने त्यावर नियंत्रण मिळवले. या घटनेची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एटीसी अधिकाऱ्याने तात्काळ टेक ऑफ करणाऱ्या फ्लाइटला थांबण्याचे निर्देश दिले. टेक-ऑफ थांबवल्यानंतर दिल्लीवरुन बागडोराकडे जाणारे विमान तात्काळ धावपट्टीवरुन हटवून पार्किंगमध्ये नेण्यात आले.

पायलटच्या सूचना ऐकून प्रवासी चिंतेत 
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार, टेक-ऑफ आणि लँडिंग प्रक्रियेदरम्यान इतर कोणत्याही फ्लाइटच्या हालचालींना परवानगी नसते. बागडोगरा-जाणाऱ्या विमानाच्या पायलटने एटीसीच्या सूचनेमुळे उड्डाण होणार नाही, असे सांगताच प्रवासी थोडे घाबरले. पण, नंतर त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव झाली आणि ते सर्वजण शांत झाले. 

Web Title: delhi airport, Instructions for simultaneous take-off and landing of two aircraft; A major accident was averted at Delhi airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.