Arvind Kejriwal : "मला सत्तेचा लोभ नाही, मी राजीनामा..."; अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 03:14 PM2023-11-18T15:14:11+5:302023-11-18T15:34:35+5:30

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपावर जोरदार निशाणा साधला.

delhi Arvind Kejriwal said bjp plans his arrest ask workers about resign | Arvind Kejriwal : "मला सत्तेचा लोभ नाही, मी राजीनामा..."; अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

Arvind Kejriwal : "मला सत्तेचा लोभ नाही, मी राजीनामा..."; अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर आम आदमी पार्टी (AAP) कार्यकर्ता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपावर जोरदार निशाणा साधला. कार्यकर्ता परिषदेत दिल्लीचे सर्व आमदार, नगरसेवक, पक्षाचे खासदार आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

अरविंद केजरीवाल यांना यावेळी सर्वांनी एकमताने कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देण्याची विनंती केली. या कार्यक्रमाबाबत माहिती देताना दिल्लीचे कॅबिनेट मंत्री राजकुमार आनंद म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांची विनंती मान्य केली आणि आम्ही जनतेचं मत लक्षात घेऊ आणि त्यानंतर दिल्लीतील लोक जे म्हणतील ते करू असं सांगितलं.

कार्यक्रमाला संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी "मला सत्तेचा लोभ नाही, मी 49 दिवसांत राजीनामा दिला होता. राजीनाम्याबाबत माझ्या नेत्यांशी मी चर्चा केली आहे, दिल्लीतील जनतेच्या इच्छेशिवाय आम्ही काहीही करणार नाही. काय करायला हवे ते जनतेला विचारा. घरोघरी जा, जनतेला विचारा की त्यांनी राजीनामा द्यायचा की तुरुंगातून सरकार चालवायला हवं"असं म्हटलं आहे. 

"मला जेलमध्ये पाठवण्याचा प्लॅन करण्यात आला आहे. जेलमध्ये जायला आता मी घाबरत नाही. 15 दिवस जेलमध्ये राहून मी एकदा परत आलो. आत चांगली व्यवस्था आहे, त्यामुळे जेलमध्ये जाण्याची भीती बाळगू नका. मनीष सिसोदिया 9 महिने जेलमध्ये राहू शकतात. सत्येंद्र जैन वर्षभर जेलमध्ये राहू शकतात, त्यामुळे आम्हाला जेलमध्ये जाण्याची भीती वाटत नाही" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: delhi Arvind Kejriwal said bjp plans his arrest ask workers about resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.