"सौभाग्य योजनेतून ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वीज कनेक्शन दिले"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 06:04 PM2020-02-04T18:04:44+5:302020-02-04T18:05:01+5:30

दिल्लीच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

delhi assembly election 2020 narendra modi in delhi dwarka rally | "सौभाग्य योजनेतून ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वीज कनेक्शन दिले"

"सौभाग्य योजनेतून ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वीज कनेक्शन दिले"

Next

नवी दिल्लीः दिल्लीच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीर मोदींनी दिल्लीतल्या द्वारिकामध्ये निवडणुकीची रॅली केली आहे. दिल्लीची ही निवडणूक या दशकातली पहिली निवडणूक आहे. हे दशक भारताचं दशक होणार आहे. भारताची प्रगती ही आज घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असणार आहे. दिल्ली आणि देशाच्या हितासाठी आपण एकत्र उभं राहिलं पाहिजे, असं म्हणत मोदींनी दिल्लीतल्या आपच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दिल्लीत दोष देणारं नव्हे, तर दिशा देणारं सरकार हवं. सौभाग्य योजनेतून ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वीज कनेक्शन दिले'' ज्यांच्या हृदयाला गरिबीचं दुःख काय असतं हे माहीत आहे, ते लोक गरिबांना सरकारी योजनांपासून वंचित कसे ठेवू शकतात. दिल्लीत सबका साथ, सबका विकासवर विश्वास असणार सरकार हवं. दिल्ली आणि देशाच्या हितासाठी एकत्र येऊन ताकद उभी करण्याची गरज आहे, असंही मोदी म्हणाले आहे.

गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारनं ज्या वेगानं आणि कौशल्यानं कामं हाती घेतलेली आहेत, ते अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्यानंतर एवढ्या वेगानं कुठल्याच सरकारनं आधी काम केलेलं नाही. दिल्लीतल्या शेतकऱ्यांचा काय दोष आहे, ज्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नाही.

दिल्लीतल्या डेली Commuterचा काय दोष आहे, जो मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील विस्ताराला दोन वर्षांपर्यंत मंजुरी दिलेली नाही, असं म्हणत मोदींनी केजरीवालांवर निशाणा साधला आहे. या सभेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीसुद्धा संबोधित केलं आहे. आम आदमी पार्टीच्या दिल्लीतल्या सरकारनं जनतेला दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केलेली नाहीत. त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. केजरीवाल सरकारनं दिल्लीत एकसुद्धा नवीन शाळा उघडलेली नसल्याची टीका नड्डा यांनी केली आहे.

 

Web Title: delhi assembly election 2020 narendra modi in delhi dwarka rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.