News Of The Day: दिल्लीत आपची जोरदार मुसंडी; भाजपाची घसरगुंडी, काँग्रेसची दांडी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 07:22 AM2020-02-11T07:22:07+5:302020-02-11T07:23:38+5:30

Delhi Election 2020 Results Live Updates : केजरीवाल हॅट्ट्रिक साधणार की भाजपा बाजी मारणार?

Delhi Assembly Election 2020 Results Live latest news on delhi vidhan sabha seats and party wise winners | News Of The Day: दिल्लीत आपची जोरदार मुसंडी; भाजपाची घसरगुंडी, काँग्रेसची दांडी

News Of The Day: दिल्लीत आपची जोरदार मुसंडी; भाजपाची घसरगुंडी, काँग्रेसची दांडी

Next

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. आम आदमी पार्टीनं ४६ जागा जिंकल्या असून १६ मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टीनं ६ जागा जिंकल्या असून २ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार आलं आहे. काँग्रेसच्या कामगिरीत मात्र सुधारणा दिसून आलेली नाही. सध्या काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही. त्यामुळे यंदाही काँग्रेसला भोपळा मिळणार हे स्पष्ट आहे.
 

LIVE

Get Latest Updates

06:55 PM

आपनं जिंकल्या ३६ जागा; बहुमताचा आकडा पार.

06:17 PM

भाजपाचे ३ उमेदवार विजयी; ५ जागांवर आघाडी

06:16 PM

आपचे ३८ उमेदवार विजयी; २४ मतदारसंघांमध्ये आघाडी

05:53 PM

अरविंद केजरीवाल पत्नी सुनिता, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह हनुमान मंदिरात प्रार्थना



 

05:34 PM

दणदणीत विजयानंतर अरविंद केजरीवाल हनुमान मंदिरात



 

05:25 PM

काँग्रेसच्या कामगिरीचं आश्चर्य वाटत नाही- काँग्रेस नेते संदीप दीक्षित



 

05:03 PM

आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही; पराभवाचं आत्मपरीक्षण करू- भाजपा नेते मनोज तिवारी



 

04:57 PM

आज मला वाढदिवसाचं सर्वात मोठं गिफ्ट मिळालं; सुनिता केजरीवालांनी व्यक्त केल्या भावना



 

04:37 PM

दिल्लीकरांनी दिलेला कौल मान्य- भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा



 

04:17 PM

दिल्लीतल्या जनतेचं आणि अरविंद केजरीवालांचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून अभिनंदन



 

04:04 PM

तेजस्वी यादव यांच्याकडून अरविंद केजरीवालांचं अभिनंदन



 

03:55 PM

आपचा ५ जागांवर विजय; ५८ मतदारसंघांमध्ये आघाडी

03:40 PM

चांगलं काम करणाऱ्याला लोकांचा पाठिंबा; ही नव्या राजकारणाची सुरुवात- अरविंद केजरीवाल



 

03:34 PM

आप ३ जागांवर विजयी; ६० मतदारसंघांमध्ये आघाडीवर

03:19 PM

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या रोड शोला सुरुवात



 

03:14 PM

केजरीवाल दहशतवादी नव्हे, तर सच्चे देशभक्त- आप नेते राघव चढ्ढा



 

03:00 PM

दिल्लीतल्या मतदारांना द्वेषाचं राजकारण नाकारलं- मनीष सिसोदिया



 

02:51 PM

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा संघर्षपूर्ण विजय; भाजपा उमेदवार रविंदर नेगी पराभूत

02:49 PM

भाजपाच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही : शरद पवार

02:47 PM

शरद पवारांकडून अरविंद केजरीवाल आणि आपचं अभिनंदन

02:43 PM

आपची ६२ जागांवर आघाडी; भाजपा ८ मतदारसंघांत पुढे

02:33 PM

भाजपा उमेदवार कपिल मिश्रा यांच्याकडून अरविंद केजरीवाल, आपचं अभिनंदन



 

02:14 PM

अरविंद केजरीवालांकडून डबल जल्लोष; आपच्या विजयासह पत्नीचा वाढदिवस साजरा



 

01:46 PM

ही निवडणूक शिक्षणाच्या मुद्द्यावर लढली गेली असती, तर शिक्षणमंत्री सिसोदिया पिछाडीवर नसते- भाजपा खासदार परवेश वर्मा



 

01:38 PM

नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडून विधानसभा विसर्जित



 

01:31 PM

हा कामाचा विजय अन् द्वेषाचा पराभव- आप नेते अमनतुल्लाह खान



 

01:09 PM

भाजपा खासदार गौतम गंभीरकडून केजरीवालांचं अभिनंदन



 

12:57 PM

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची आपच्या कार्यालयात भेट



 

12:51 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून अरविंद केजरीवालांचं अभिनंदन



 

12:39 PM

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह आपचे महत्त्वाचे नेते पक्ष मुख्यालयात पोहोचले



 

12:21 PM

आपचे अमनतुल्लाह खान ओखला मतदारसंघातून पुढे



 

12:17 PM

दिल्ली काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा राजीनामा देणार; मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारली

12:12 PM

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भाजपाच्या रविंदर सिंग नेगी यांच्यात कडवी लढत



 

11:52 AM

आपचे मनीष सिसोदिया, अतिषी मार्लेना पिछाडीवर



 

11:45 AM

आपच्या मुंबईतल्या कार्यालयात जल्लोषाचं वातावरण



 

11:34 AM

काँग्रेस जंगपुरा मतदारसंघात आघाडीवर

11:22 AM

आप ५४, भाजपा १५ मतदारसंघांत आघाडीवर; काँग्रेस एका जागेवर पुढे

11:16 AM

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पतपारगंज मतदारसंघात पिछाडीवर



 

11:09 AM

आपचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल पिछाडीवर



 

11:04 AM

मॉडेल टाऊनमधून भाजपाचे कपिल मिश्रा पिछाडीवर



 

11:00 AM

आपचा विजय जवळपास निश्चित; पंजाबमध्ये जल्लोषाला सुरुवात



 

10:44 AM

दिल्लीकरांचा कौल भाजपा आणि त्यांच्या जातीय राजकारणाविरोधात- काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी



 

10:30 AM

मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर आपचे जर्नेल सिंग तिलक नगरमधून आघाडीवर



 

10:22 AM

चांदनी चौक मतदारसंघातून काँग्रेसच्या अलका लांबा पिछाडीवर



 

10:09 AM

भाजपाचे कपिल मिश्रा मॉडेल टाऊनमधून आघाडीवर



 

09:59 AM

नवी दिल्ली मतदारसंघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आघाडीवर



 

09:50 AM

हरी नगर मतदारसंघात भाजपाचे ताजिंदरपाल सिंग बग्गा पिछाडीवर



 

09:43 AM

कस्तुरबा मतदारसंघातून आपचे मदन लाल आघाडीवर


09:36 AM

आपची ५१ मतदारसंघांत आघाडी; भाजपा १९ जागांवर पुढे

09:26 AM

राजींदर नगर मतदारसंघातून आपचे राघव चढ्ढा आघाडीवर



 

09:05 AM

आप ५३ जागांवर, तर भाजपा १६ जागांवर पुढे; काँग्रेसला केवळ एका मतदारसंघात आघाडी

08:50 AM

आपला ५५, तर भाजपाला १४ मतदारसंघांत आघाडी

08:43 AM

भाजपाचे कपिल मिश्रा, ताजिंदरपाल सिंग बग्गा पिछाडीवर

08:39 AM

आप सुस्साट; ४८ जागांवर आघाडी, भाजपा १३ मतदारसंघात पुढे

08:30 AM

सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही

08:29 AM

सुरुवातीच्या कलांमध्ये आपची मुसंडी; आप ४० जागांवर आघाडीवर, तर भाजपा १२ मतदारसंघात पुढे

08:14 AM

सुरुवातीच्या कलांमध्ये आप ३२ जागांवर पुढे; भाजपाला १० जागांवर आघाडी

07:48 AM

आपच्या कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी



 

07:46 AM

पाच वर्षे जनतेची कामं केल्यानं आम्हाला विजयाचा विश्वास- मनीष सिसोदिया



 

07:29 AM

दिल्लीत भाजपाचं सरकार येणार; मनोज तिवारींना विश्वास



 

07:28 AM

थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

Read in English

Web Title: Delhi Assembly Election 2020 Results Live latest news on delhi vidhan sabha seats and party wise winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.